महाराष्ट्र

maharashtra

सोलापूरातील बार्शी येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा खून

By

Published : Oct 23, 2020, 12:19 PM IST

कळंबवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा भरदिवसा खून केल्याची घटना घडली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर
सोलापूर

सोलापूर -कळंबवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा उंबरगे ते आगळगाव रस्त्यावरील हायस्कूलसमोर भरदिवसा दोघांनी खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. त्रिंबक उमाप (वय 62) असे खून झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिभीषण विश्वनाथ उमाप, विश्वनाथ बापू उमाप (दोघे रा. कळंबवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्रिंबक उमाप यांचा मुलगा गणेश याने फिर्याद दाखल केली. चार वर्षांपूर्वी उमाप हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

त्रिंबक उमाप हे बार्शीकडे जात असताना आरोपींनीत्यांना अडवून मारहाण केली. त्यावेळी रस्त्यावरून जाणार्‍यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपींनी शिक्षकांला दगडानेही मारले. याची माहिती काही लोकांनी गणेशला फोनवरून दिली. त्यावेळी फिर्यादीने तातडीने घटनास्थळ गाठले. तेव्हा वडील रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेले त्याला दिसले.

जखमी अवस्थेत उमाप यांना बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. त्रिंबक उमाप यांनी करमाळा तालुक्यासह सौंदरे, मांडेगाव येथे सेवा बजावली होती. त्रिंबक उमाप यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details