महाराष्ट्र

maharashtra

Gopichand Padalkar Criticized Sharad Pawar: गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सडकून टीका, म्हणाले गेल्या वर्षी चौंडी येथे मस्ती...

By

Published : Jun 5, 2023, 1:23 PM IST

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर हे रविवारी रात्री उशिरा सोलापुरात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा छोटेखानी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार गोपीचंद पडळकरांनी या छोटेखानी कार्यक्रमात शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. आमदार रोहित पवारांबाबत उल्लेख करताना माकड म्हणत त्यांची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या वर्षी चौंडी येथे मस्ती केली, अशी टीका पडळकर यांनी केली. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत नाराजीचे सुरू निघत आहेत.

Gopichand Padalkar Criticized Sharad Pawar
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली

गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर टीका

सोलापूर :दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्यावतीने गोपीचंद पडळकर यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. सत्कार समारंभात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत एकेरी भाषेत उल्लेख करत जहरी टीका केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत इतका कळवळा होता, तर शरद पवार हे यंदाच्या वर्षी चौंडी येथे का आले नाही. शरद पवार चार वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, तसेच केंद्रात अनेक वर्षे सत्तेत होते. त्यावेळी चौंडीला यायचे सुचले नाही. चौंडी आठवली नाही, अशी टीका करत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला. शरद पवारांच्या एकेरी उल्लेखाचा आता राष्ट्रवादीत भडका उडू शकतो.


जेजुरी संस्थांबाबत बोलताना पवारांवर टीकास्त्र :आमदार गोपीचंद पडळकर टीका करताना जेजुरी संस्थांबाबत बोलताना पवारांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचे शरद पवार यांना गेल्या वर्षी चौंडी गाव ताब्यात घ्यायचे होते. मात्र, हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. यासाठीच धनगर समाजाच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौंडी सतत जागृत ठेवले पाहिजे. जेजुरी देवस्थानामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थानने हा पुतळा बसवला. हे संस्थान होळकरांचे आहे. पवारांचा या संस्थानाशी काहीही संबंध नाही. होळकरांनी या जेजुरी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, ही होळकरांची जहागिरी आहे असे पडळकर यांनी सांगितले.

रोहित पवारांची उडवली खिल्ली :गोपीचंद पडळकर म्हणाले, रोहित पवार हे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. पण धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात. त्यांच्या दावणीला किती कोंबड असतात, हे तुला माहिती नाही का माकडा? असे म्हणत पडळकर यांनी रोहित पवार यांचा माकड असा उल्लेख केला. धनगर समाज काय उपाशी आहे, तुम्ही प्रसाद वाटताय. धनगरांच्या घरी पाहुणे आले तरी कोंबड कापतात. तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा टोला पडळकरांनी रोहित पवारांना लगावला.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar Reaction: ओडिशा रेल्वे अपघाताबाबत शरद पवारांचे मोठे विधान, इतिहासातील 'त्या' घटनेची करून दिली आठवण
  2. Sanjay Raut Vs Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे सिंहासन लवकर हलणार-संजय राऊत
  3. CM Arvind Kejriwal in Mumbai : '...तरच दिल्लीतील सेवा नियंत्रणावरील अध्यादेशाचा राज्यसभेत पराभव होऊ शकतो'

ABOUT THE AUTHOR

...view details