महाराष्ट्र

maharashtra

विविध मागण्यांसाठी माकपाचे सोलापुरात केंद्र अन् राज्य सरकारविरोधात आंदोलन

By

Published : Sep 22, 2020, 5:21 PM IST

विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर शहर व जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.

आंदोलक
आंदोलक

सोलापूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदी अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर केंद्र व राज्य सरकारने प्रभावी उपाय योजना कराव्यात, यांसह विविध मागण्यांसाठी माकपाच्या वतीने आज (मंगळवार) सोलापुरातील विविध भागांत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन माकपाचे जिल्हा सचिव अ‌ॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

बोलताना माकपचे जिल्हा सचिव अ‌ॅड. एम. एच. शेख

माकपाने देशव्यापी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सप्ताह आयोजित केला आहे. कामगार, कष्टकरी, कर्मचारी यांच्या रोजगाराचे प्रश्न घेऊन देशव्यापी मागणी सप्ताहाची हाक देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकठिकाणी मागण्यांचे फलक दाखवून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

या आहेत प्रमुख मागण्या

  • राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबीयांस दहा हजार रुपये द्यावे
  • सहा महिन्याचे वीज बिल माफ करावे
  • केंद्र सरकाने प्रतिमहा डिसेंबर महिन्यापर्यंत साडेसात हजार रुपये प्रति कुटुंब द्यावे
  • प्रति व्यक्ती दरमहा दहा किलो धान्य द्यावे
  • ज्यांचे रोजगार या टाळेबंदीच्या काळात गेले आहेत त्यांच्यासाठी रोजगारनिर्मिती करावी

हेही वाचा -खासदारांच्या मठासमोर तर आमदारांच्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी 'आसूड ओढो'

ABOUT THE AUTHOR

...view details