महाराष्ट्र

maharashtra

असेही पशुप्रेम, बार्शीत गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

By

Published : Jan 12, 2021, 7:32 AM IST

बार्शीत आगळा वेगळा कार्यक्रम साजरा केला. गायीला पहिल्यांदा वासरू होणार या निमित्ताने गायीचेही डोहाळे जेवण करण्यात आले. या कार्यक्रमात पाहुण्यांना निमंत्रण देऊन मिष्टान्न जेवण देण्यात आले. आपल्या घरातील पशुंबद्दल प्रेम व्यक्त करत अनुभुले कुटुंबाने समाजाला आगळा वेगळा संदेश दिला.

SOLAPUR BARSHI COW DOHAE JEVAN
बार्शीत गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

सोलापूर - कुटुंबात नवीन पाहुणा किंवा बाळ येणार असले तर आपला आनंद गगनात मावत नाही. बाळ होणाऱ्या मातेचे औक्षण करून डोहाळे जेवण करून मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र बार्शीत आगळा वेगळा कार्यक्रम साजरा केला. गायीला पहिल्यांदा वासरू होणार या निमित्ताने गायीचेही डोहाळे जेवण करण्यात आले. या कार्यक्रमात पाहुण्यांना निमंत्रण देऊन मिष्टान्न जेवण देण्यात आले. आपल्या घरातील पशुंबद्दल प्रेम व्यक्त करत अनुभुले कुटुंबाने समाजाला आगळा वेगळा संदेश दिला. त्यामुळे अनुभुले कुटुंबाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बार्शीत गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

गायीचे डोहाळे जेवण धुमधडाक्यात

बार्शीतील कासारवाडी गावातील रमेश अनुभुले यांची 26 एकर शेती आहे. शेतीसोबतच ते पशुसंवर्धन देखील करतात. अलीपुर रस्त्यावर रमेश अनुभुले यांनी गोठा बांधला आहे. गोठ्यातील गाय पहिल्यांदाच गर्भवती राहिल्याने अनुभुले कुटुंबाने आनंद साजरा करायचे ठरवले. अनुभुले कुटुंबाने गोमातेचे औक्षण भरून मोठ्या धुमधडाक्यात आपल्या गायीचे डोहाळे जेवण केले.

मानवाप्रमाणे गोमातेचे संरक्षण व्हावे असा संदेश देण्याचा प्रयत्न
समाजात ज्याप्रमाणे मानवाला संरक्षण दिले जाते त्याप्रमाणे गोमातेचे देखील संरक्षण व्हावा हा यामागील उद्देश आहे. समाजात गायीवरील श्रद्धा, गायीचे आपल्या जीवनातील स्थान त्यापासून मिळणारे फायदे हे आरोग्यासाठी उपायकारक आहेत, असे रमेश अनुभुले यांनी सांगितले.
हेही वाचा -प्रतिक्षा संपली! कोविशिल्ड सिरममधून १३ शहरांमध्ये रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details