महाराष्ट्र

maharashtra

Boiler Dispute : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा चिमणी वाद अनावश्यक - सुशीलकुमार शिंदे

By

Published : Dec 4, 2022, 5:38 PM IST

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Sushil Kumar Shinde ) यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ( Siddheshwar Cooperative Sugar Factory ) चिमणीबाबच वक्तव्य केले आहे. माझ्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाला एकाच वेळी 28 विमान ( Solapur Airport ) उतरली होती. त्यावेळी चिमणी अडथळा ठरली नाही. हे सगळ फुजुल सुरू ( Boiler Dispute of Siddheshwar Cooperative Sugar Factory ) असल्याचेही शिंदे म्हणाले.

Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

सोलापूर- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Sushil Kumar Shinde ) यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ( Siddheshwar Cooperative Sugar Factory ) चिमणीवर मोठी माहिती दिली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना माहिती दिली की,मी अनेकदा सोलापूरला विमानाने आलो गेलो. माझ्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाला 28 विमान उतरली होती. त्यावेळी चिमणी अडथळा ठरली नाही. हे सगळं फुजुल आहे असे शिंदे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.

सुशीलकुमार शिंदे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन -विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका सोलापूर विकास मंचने घेतली आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे .चिमणी वाचवण्यासाठी साखर कारखान्याचे शेतकरी सभासद ,कर्मचारी यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

बोरामणी विमानतळाबाबत माहिती दिली -सोलापुरात विमानतळ व्हावे यासाठी बोरामणी विमानतळाबाबत मी माझ्या काळात प्रयत्न केले होते. पण, पुढे पाठपुरावा करणे गरजेचे होते, असे सांगून शिंदे म्हणाले की, बोरामणी विमानतळासाठी २०१० पासून भूसंपादानाचे काम सुरू झालं. जमीन ताब्यात आल्यानंतर विमानतळाच्या संरक्षक भिंतीचे काम झालं. मी २०१४ पर्यंतच होतो, त्यानंतरचं मला माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.

सोलापुरात हे सगळं फुजुल चाललं आहे -सोलापुरात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी वरून रणकंदन माजले आहे.चिमणीबाबत शिंदे यांनी आपले मौन तोडले आहे,हे सगळं फुजुल सुरू आहे.मला तर वाटतंय की होटगी रोड विमानतळ येथे चिमणी तर अडथळा ठरत नाही. माझ्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाला एकाच वेळी 28 विमान उतरली होती,त्यावेळी चिमणी अडथळा ठरली नाही.हे सगळ फुजुल सुरू आहे असे शिंदे नी सांगितले.तसेच प्रवाशी विमाना साठी अगोदर प्रवाशी विमान कंपन्या सोबत बोला तरी.ज्यांची ताकद आहे त्यांनी बोलावं मग चिमणी बाबत विचार करावा असे शिंदे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details