महाराष्ट्र

maharashtra

Chandrakant Patil Ink Throw : चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाईफेक, भाजपाविरोधात घोषणाबाजी; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 10:00 PM IST

Updated : Oct 15, 2023, 10:36 PM IST

Chandrakant Patil Ink Throw : सोलापुरात रविवारी भाजपा नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडली. भीम आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.

Chandrakant Patil Ink Throw
चंद्रकांत पाटील

पहा व्हिडिओ

सोलापूरChandrakant Patil Ink Throw : सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी प्रथमच जिल्ह्यात आले होते. या दरम्यान त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. शासकीय नोकरभरतीचं खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं : या घटनेनंतर पोलिसांनी भीम आर्मी संघटनेचा कार्यकर्ता अजय मैंदर्गीकर याला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं. जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून चंद्रकांत पाटील यांचा सोलापुरात विरोध सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. रविवारी संध्याकाळी चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृहात येणार होते. त्या आधी विश्रामगृहाला अक्षरश: छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या दरम्यान भीम आर्मीच्या अजय मैंदर्गीकर यानं सुरक्षा भिंत तोडून चंद्रकांत पाटलांवर शाई फेकली. यावेळी भीम आर्मीच्या पादाधिकाऱ्यांनी कंत्राटी भरती विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न केला.

या आधीही असे प्रकार घडले आहेत : गेल्या महिन्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात भंडारा उधळण्यात आला होता. शेखर भंगाळे नावाच्या तरुणानं धनगर आरक्षणाची मागणी करत विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या आधी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातही शाईफेक करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानं यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक, विखे पाटलांवर भंडारा उधळला; Watch Video
  2. Bhandara Scattered On Vikhe Patil : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळ्यानं गोंधळ, नेमकं काय घडलं?
Last Updated : Oct 15, 2023, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details