महाराष्ट्र

maharashtra

सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासकाची नेमणूक

By

Published : Mar 9, 2021, 11:47 AM IST

जिल्हा दूध संघाला विविध कारणांमुळे पंचवीस ते तीस कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. तसेच जिल्ह्यातील संघाची कायम ठेवही संपत आली आहे. अशा विविध कारणांमुळे पुणे विभाग उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहे.

सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासकाची नेमणूक
सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासकाची नेमणूक

पंढरपूर : सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. जिल्हा दूध संघाला विविध कारणांमुळे पंचवीस ते तीस कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. तसेच जिल्ह्यातील संघाची कायम ठेवही संपत आली आहे. अशा विविध कारणांमुळे पुणे विभाग उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहे.
दूध संघावर प्रशासकीय मंडळ स्थापन
सोलापूर जिल्हा दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासनाकडून त्रिस्तरीय वर मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर तर सहाय्यक निबंधक म्हणून आप्पासाहेब गावडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुनील शिंदे हे सदस्य असणार आहे. हे मंडळ सहा महिन्यांसाठी प्रशासकीय मंडळ म्हणून कार्यरत असणार आहे. सहा महिन्यानंतर मुदतवाढ देण्याचा अधिकार शासनाकडे असणार आहे.
दूध संघाचे संचालक मंडळावरील आरोप
जिल्हा दूध संघातील सध्याच्या मंडळातील सदस्यांवर विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले आहेत. यात संचालक मंडळाकडून दूध संघाची बिले थकविणे, कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित ठेवणे, अनुमती नसतानाही संघाच्या मालकीच्या मालमत्तेची विक्री करणे असे आरोप लावण्यात आले आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी संचालकांना नोटिसा बजावूनही कोणत्याही प्रकारचे उत्तर संचालक मंडळाकडे आले नाही. यामुळे 25 फेब्रुवारी 2019 रोजी सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details