महाराष्ट्र

maharashtra

क्रीडा विश्वावर शोककळा! महाराष्ट्राच्या धावपटूचा हरियाणात स्पर्धेदरम्यान मृत्यू

By

Published : Sep 23, 2021, 9:31 AM IST

Bandu Dattatraya Waghmode

करमाळा येथील धावपटूचा हरियाणात आकस्मिक मृत्यू झाला. बंडू दत्तात्रय वाघमोडे असे त्या खेळाडूचे नाव आहे. तो हरियाणात स्पर्धेसाठी गेला होता.

पंढरपूर (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील धावपटूचा (Runner) हरियाणात (in haryana) आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंडू दत्तात्रय वाघमोडे (Bandu Dattatraya Waghmode) असे त्या खेळाडूचे नाव आहे. तो धावण्याच्या स्पर्धेसाठी तेथे गेला होता. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराने (heart attack) बंडू वाघमोडे याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पर्धेदरम्यान बंडूचा मृत्यू

बंडू वाघमोडे हा दहा युवकांसोबत धावण्याच्या स्पर्धेसाठी हरियाणा राज्यातील महक (Mahak) येथे गेला होता. 19 सप्टेंबर रोजी बंडू वाघमोडे धावण्याच्या स्पर्धेत धावत असताना खाली कोसळला व त्याचा मृत्यू झाला.

वाघमोडे कुटुंबावर शोककळा

बंडू वाघमोडे आपल्या परिवारास निलज येथे राहत होता. दत्तात्रय वाघमारे हे त्याचे वडिल मेंढी पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांना बंडू व नामदेव अशी दोन मुले व दोन मुली आहेत.

करमाळा येथील श्री कमलादेवी स्पोर्टस्‌ क्‍लबमध्ये बंडू वाघमोडे धावण्याचा सराव करत होता. बंडू वाघमोडे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. दरम्यान, या घटनेमुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा -राज्यपाल निभावत आहेत मदमस्त हत्तीचा रोल, शिवसेनेची केंद्र आणि कोश्यारींवर कडाडून टीका

ABOUT THE AUTHOR

...view details