महाराष्ट्र

maharashtra

नारायण राणेंनी आमदारकी लढवून दाखवावी; शिवसेना आमदार वैभव नाईकांचे खुले आव्हान

By

Published : Nov 4, 2020, 6:18 PM IST

Updated : Nov 4, 2020, 6:47 PM IST

शिवसेनेना आव्हान देण्यापेक्षा नारायण राणे यांनी 2024 ची आमदारकीची निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना दिले आहे.

आमदार वैभव नाईक खासदार नारायण राणे
आमदार वैभव नाईक खासदार नारायण राणे

सिंधुदुर्ग -कोकणातून शिवसेना संपवणार म्हणणारे खासदार नारायण राणे आव्हान देतात आणि स्वतःच पळ काढतात. २०१४ ला माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाने त्यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ ला त्यांनी पळ काढला. आता आव्हान देऊन थांबू नका. २०२४ ला स्वतः निवडणूक लढवावी मग पाहू काय होते, अशा शब्दात शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना खुले आव्हान दिले आहे.

हेही वाचा -'लॉकडाऊनमध्ये मदत केली नाही अन् आता मत मागायला आले'

कोकणातून शिवसेना संपवणार - नारायण राणे

वैभव नाईक, शिवसेना आमदार

खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी भाजप जिल्हा कार्यकारणीची बैठक घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत, कोकणात शिवसेनेचे ११ आमदार आहेत त्यांना घरी बसवणार आणि सेनेला कोकणातून हद्दपार करणार असे वक्तव्य केले होते. यावर आमदार वैभव नाईक यांनी राणेंना उत्तर देताना खुले आव्हान दिले आहे.

नारायण राणेंनी आमदारकीला उभे राहावे - आमदार वैभव नाईक

आमदार वैभव नाईक म्हणाले, नारायण राणेंनी शिवसेना संपवण्याची जेव्हा जेव्हा भाषा केली त्यानंतर शिवसेना आजवर पहिल्यापेक्षा दुप्पट्टीने वाढली आहे. मंगळवारी राणेंनी शिवसेनेचे कोकणातून ११ आमदार निवडून येणार नसल्याचे आव्हान दिले आहे. राणेंचे हे आव्हान स्विकारून शिवसेनेने २०१४ मध्येच त्यांचे आव्हान मुळातून मोडून काढले, त्यांचा निवडणुकीत पराभव झालाच. तर त्यांच्या मुलाचा देखील सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात २ वेळा शिवनेनेने पराभव केला. तसेच राणेंना माहितीच असेल गेल्या निवडणुकीत त्यांचा मुलगा पक्ष बदलून भाजपमधून उभा राहिला म्हणून, अन्यथा तोही पराभूत झाला असता. त्यामुळे जेव्हा जेव्हा राणें शिवसेना संपवण्याचे आव्हान करतात तेव्हा कोकणातील जनताच आव्हान संपुष्टात आणते. तरीही राणेंना अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी स्वतः २०२४ ला पुन्हा आमदारकी लढवावी, असे खुले आव्हान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.

हेही वाचा -गोस्वामी आक्रमक बोलतात, मग मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात वाट्टेल ते बोललेले चुकीचे नाही का?

शिवसेनेचा आता मुख्यमंत्री देखील आहे. आपण २०१९ ला निवडणुकीतून पळ काढलात, आता तुम्हाला आमचे आव्हान आहे, २०२४ च्या निवडणुकीत उभे राहा. त्यावेळी तुम्हाला कळेल शिवसेनेचे ११ आमदार येतात की २१, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

Last Updated :Nov 4, 2020, 6:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details