महाराष्ट्र

maharashtra

Vaibhav Naik: ठाकरेंच्या निष्ठावंतांवर चौकशीचा फास..? शिवसेना आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

By

Published : Oct 8, 2022, 1:37 PM IST

सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीकडून (MLA Vaibhav Naik ACB Investigation) आज चौकशी करण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता ठाकरे गटाच्या निष्ठावंत आमदारांवर चौकशीचा फास (Shiv Sena MLA Vaibhav Naik Investigation) आवळला जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. एसीबीकडून नाईक यांना खर्च आणि मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेश (submission of statement of expenses and assets) देण्यात आले आहे.

शिवसेना आमदार वैभव नाईक याची एसीबीकडून चौकशी
शिवसेना आमदार वैभव नाईक याची एसीबीकडून चौकशी

सिंधुदुर्ग : जिल्हा शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीकडून (MLA Vaibhav Naik ACB Investigation) आज चौकशी करण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता ठाकरे गटाच्या निष्ठावंत आमदारांवर चौकशीचा फास (Shiv Sena MLA Vaibhav Naik Investigation) आवळला जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. एसीबीकडून नाईक यांना खर्च आणि मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेश (submission of statement of expenses and assets) देण्यात आले आहे.

आमदार नाईक यांची विश्रामगृहावर कसून चौकशी-कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आणि मधल्या सत्तांतराच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीच्या पथकाकडून आज कणकवली शासकीय विश्रामगृहावर चौकशी करण्यात आली. याबाबतचा तपशील एसीबीकडून देण्यात आलेला नाही. तरी वैभव नाईक यांनी अशा कितीही चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत, असे म्हटले आहे.

शिवसेना आमदार वैभव नाईक याची एसीबीकडून चौकशी

खर्च आणि मालमत्तेचे विवरणपत्र सादर करा; एसीबी -दरम्यान एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी वैभव नाईक यांना 12 ऑक्टोबरपर्यंत खर्च आणि मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे लेखी पत्र यावेळी दिले आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया आली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत राहिलेल्या आमदारांवर दबाव आणण्याचा प्रकार घडत आहे. आपल्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचे विवरण पत्र सादर करण्याचे लेखी पत्र दिले आहे. आपण आजवर कोणताही घोटाळा केलेला नाही. त्यामुळे एसीबीने मागितलेली माहिती लवकरच आपण सादर करू असे ते म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details