महाराष्ट्र

maharashtra

Sindhudurg Sand Smugglers : वाळू माफीयांची वाढली मुजोरी; तहसिलदारांनाच केली धक्काबुक्की

By

Published : Jan 8, 2023, 10:47 PM IST

Sand smugglers shocked to Tahsildars
मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील ()

सिंधुदुर्गात वाळू वाहतुकांचा हौदोस सुरू आहे. अनधिकृत वाळू वाहतूक सुरू असलेले डंपर मालवणचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना डंपर चालकांसह तेथे आलेल्या दोन चारचाकीमधील संशयितांनी धक्काबुक्की (Sand smugglers shocked to Tahsildars) केल्याची घटना घडली आहे. श्रीधर पाटील यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली असता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.(Sindhudurg Sand Smugglers)

सिंधुदुर्ग : अनधिकृत वाळू वाहतूक सुरू असलेले डंपर रोखण्याचा प्रयत्न करताना डंपर चालकांसह तेथे आलेल्या दोन चारचाकीमधील संशयितांनी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या पथकाशी हुज्जत घालतानाच धक्काबुक्की केल्याच्या घटनेबाबत पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. वाळूचे डंपर रोखणाऱ्या तहसीलदारांना धक्काबुक्की (Sand smugglers shocked to Tahsildars) करणाऱ्या या अनधिकृत वाळू माफियांची दहशत वाढली आहे, त्यामुळे आता महसूल प्रशासनाने ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. (Sindhudurg Sand Smugglers)

तहसिलदारास धक्काबुक्की : अनधिकृत वाळू वाहतूक सुरू असलेले डंपर रोखण्याचा प्रयत्न करताना डंपर चालकांसह तेथे आलेल्या दोन चारचाकीमधील संशयितांनी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या पथकाशी हुज्जत घालतानाच धक्काबुक्की केल्याच्या घटनेबाबत श्रीधर पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच डंपर चालक,२ कारमधून आलेल्या काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जानेवारीला रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे श्रीधर पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा आचरा पोलीस ठाणे येथे नोंद झाला. मात्र, घटना कणकवली तालुक्याच्या हद्दीतील बीडवाडी असल्याने तपास कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली.

तहसिलदारांनी केला पंचनामा : तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या फिर्यादीनुसार, पाटील व त्यांचे पथक वाहनातून ओसरगाव- असरोंडी-किर्लोस रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना निरोम येथे कणकवलीच्या दिशेने जात असलेले वाळूने भरलेले पाच डंपर दिसले. पाटील व पथकाने सर्व डंपरना थांबण्याचा इशारा केला. मात्र, पाचही डंपर पाटील यांच्या ताब्यातील वाहनाला हूल देत भरधाव वेगाने कणकवलीच्या दिशेने गेले. पाटील यांच्या पथकाने डंपरचा पाठलाग केला. बीडवाडी येथे डंपर गाठण्यात पथकाला यश आले. पाटील व पथकाने पाचही डंपर चालकांना वाळू परवाना आहे का, अशी विचारणा केली. डंपर चालकांकडे उत्तर नव्हते. ही वाळू कुठे भरली, असे विचारले असता चालकांनी तेरई खाडीत भरल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील व पथकाने पंचनाम्यास सुरुवात केली.

ABOUT THE AUTHOR

...view details