महाराष्ट्र

maharashtra

नारायण राणेंच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून कणकवली नगरपंचायत सभेत खडाजंगी

By

Published : Nov 25, 2021, 8:23 PM IST

कणकवली नगरपंचायत सभेत खडाजंगी

कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खासगी क्षेत्रातील रस्त्यासाठी कणकवली वाशीयांच्या हक्काचा पैसा खर्चू देणार नाही, अशी भूमिका कणकवलीमधील ग्रामपंचायतीच्या शिवसेना सदस्यांनी सभेत घेतली. या सदस्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराच्या दिशेने जाणाऱ्या रस्ते कामाला जोरदार विरोध केला.

सिंधुदुर्ग -शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वादाचे पडसाद कणकवली नगरपंचायतीत दिसून आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवलीतील बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आज कणकवली नगरपंचायत सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली. जनतेचा पैसा असा वाया जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेच्या सदस्यांनी राणेंच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्ते कामाला विरोध केला.

कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा ( Kankavli Nagar Panchayat GB meeting) आज उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्याधिकारी अवधूत तावडे व इतर नगरसेवक या सभेला उपस्थित होते. खासगी क्षेत्रातील रस्त्यासाठी कणकवलीवासीयांच्या हक्काचा पैसा खर्चू देणार नाही, अशी भूमिका कणकवलीमधील ग्रामपंचायतीच्या शिवसेना सदस्यांनी सभेत घेतली. या सदस्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराच्या दिशेने जाणाऱ्या रस्ते कामाला जोरदार विरोध केला.

हेही वाचा-Son died by fathers car : वडिलांच्याच कारखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू

कणकवली नगरपंचायत बैठकित सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमनेसामने

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी कणकवली नगरपंचायत 25 लाख रुपये खर्च करणार आहे. मात्र, खासगी क्षेत्रातील रस्त्यासाठी कणकवली शहरवासीयांच्या करातून जमा झालेला निधी खर्च करणे चुकीचे आहे, असा आरोप विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर आणि रुपेश नार्वेकर यांनी केला.

हेही वाचा-‘कामावर हजर व्हा अन्यथा...’; एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा 24 तासांचा अल्टीमेटम

जनतेचा पैसा राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी का ?

आजच्या सभेत राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनाचा विषय गाजला. शहरातील नाथ पै नगर येथील केंद्रीय मंत्री राणेंच्या घराकडे जाणाऱ्या परिसरात अंतिम रेखांकन मंजूरी नसताना घरांना परवानगी देण्यात आली. त्‍यामुळे येथील रस्ते जमीन मालकांच्या नावे राहिले आहेत. हे रस्ते नगरपंचायतीकडे वर्ग करून घेण्यासाठी २५ लाख रुपये निधी देण्याबाबतचा मुद्दा सभेत चर्चेला आला. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर आणि रुपेश नार्वेकर यांनी जनतेचा पैसा राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खर्च करण्याला तीव्र विरोध केला. तर येथील घरांना ग्रामपंचायत काळात परवानगी देण्यात आली. त्‍यावेळी नियम पाहण्यात आले नव्हते. त्‍या त्रुटी आता आम्‍हाला दुरुस्त कराव्या लागत आहेत. त्‍यामुळे स्थानिक जमीन मालकांना भूसंपादनाचे पैसे देऊन रस्ता ताब्‍यात घ्यावा लागत असल्‍याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

हेही वाचा-Maharashtra Primary Schools : राज्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून होणार सुरू

काही काळ सभागृहात वातावरण तापले

कणकवली नगरपंचायतीच्या आजच्या सर्वसाधारण सभेत झालेली सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी जिल्हाभर चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या घरी जाणाऱ्या रस्त्यावरून झालेल्या खडाजंगीने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. कणकवलीतील राजकीय वातावरणदेखील या खडाजंगीनंतर तापले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details