महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर झाडे तोडून वाहतूक केली बंद

By

Published : Aug 25, 2021, 3:59 AM IST

Updated : Aug 25, 2021, 4:08 AM IST

कणकवली तालुक्यातील वरवडे पाठोपाठ पिसेकामते, कलमठ या ठिकाणीही झाडे तोडून मार्ग बंद करण्यात आले. हा मार्ग उशिरापर्यंत ठप्प झाला होता. तर मालवण तालुक्यातील नेरूरपार पूल येथे अज्ञातांनी झाडे तोडून मार्ग वाहतुकीला बंद केला.

झाडे तोडली
झाडे तोडली

सिंधुदुर्ग -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद जिल्ह्यातील रस्त्यावरही उमटले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांचे गाव असलेल्या वरवडे येथे कणकवली आचरा राज्य मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला. जिल्ह्याच्या अन्य भागातही झाडे तोडून मार्ग बंद करण्यात आले. राणेंच्या वरवडे गावातही मोठ्या प्रमाणात झाडे तोडून मार्ग पूर्णतः बंद करण्यात आले. कणकवली तालुक्यातील वरवडे पाठोपाठ पिसेकामते, कलमठ या ठिकाणीही झाडे तोडून मार्ग बंद करण्यात आले. हा मार्ग उशिरापर्यंत ठप्प झाला होता. तर मालवण तालुक्यातील नेरूरपार पूल येथे अज्ञातांनी झाडे तोडून मार्ग वाहतुकीला बंद केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला करून रस्ता सुरळीत केला.

भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर झाडे तोडून वाहतूक केली बंद
कणकवली आचरा मार्ग पूर्णपणे ठप्प

राणेंच्या अटकेच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिह्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून पडसाद उमटू लागले असतानाच कणकवली-आचरा मार्गावर वरवडे भागात भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झाडे तोडून रस्ता वाहतुकीला बंद करून राणेंच्या अटकेचा निषेध केला. दरम्यान, राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ जिह्यात राणे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वरवडे हे राणेंचे गाव आहे. या गावात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली. तर पणदूरमध्येही तीव्र पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्थ कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा बाजारपेठ बंद करण्यात आले.

कणकवली पोलीस ठाण्यात महिलांचा ठिय्या

कणकवली येथे भाजपा कार्यकर्ते एकवटून कणकवली पोलीस स्टेशनवर आले आणि या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत नारायण राणे यांची सुटका केली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नारायण राणे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून ठाकरे सरकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहे आणि ही अटक बेकायदेशीर असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा -महाड : एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त; अनेक रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद

Last Updated :Aug 25, 2021, 4:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details