महाराष्ट्र

maharashtra

अनैतिक संबंधाच्या संशयातून भाजी विक्रेत्याची तलवारीचे वारकरून हत्या, चौघांना अटक

By

Published : Sep 27, 2021, 8:26 PM IST

Vegetable seller's Murder by sword in karad, satara; four arrested

कोरेगाव तालुक्यातील भाजी विक्रेत्याची तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कराड-पुसेसावळी मार्गावरील वाघेरी (ता. कराड) हद्दीत घडली आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

कराड (सातारा) - अनैतिक संबंधाच्या संशयावरून डोळ्यात चटणी टाकून भाजी विक्रेत्याची तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कराड-पुसेसावळी मार्गावरील वाघेरी (ता. कराड) हद्दीत शनिवारी (दि. 25) रात्री उशीरा ही घटना घडली. रमेश रामचंद्र पवार (वय 40, रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे हत्या करण्यात आलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव असून याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

चौघांना अटक -

मृताचा भावाने कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेल्या फिर्यादीमध्ये दीपक इंगळे, संदीप इंगळे आणि अनोळखी दोघे अशा चौघांनी रमेश याचा खून केल्याचे म्हटले होते. त्याआधारे कराड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयितांना अटक केली आहे.

भाजीपाला आणण्यासाठी केले होते कराडला -

फिर्यादी नवनाथ पवार आणि त्याचा भाऊ रमेश पवार हे दोघेजण कोरेगाव तालुक्यातील असून भाजीपाला विक्रीचा फिरता व्यवसाय करीत होते. संशयीत आरोपी दीपक इंगळे हा त्यांच्याच गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी व रमेश पवार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय दीपकला होता. त्यावरून दीपक आणि रमेश यांच्यात दोन दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला होता. शनिवारी (दि. 25) दुपारी रमेश हा गावातील लखन बालेखान मुलाणी यांच्या बोलेरो गाडीतून भाजीपाला आणण्यासाठी कराडला आला होता. त्याच्यासोबत गाडीचालक लखन मुलाणी, अमर नेटके, दत्तात्रय पवार होते.

डोळ्यात मिचरी पूड टाकून केले तलवारीचे वार -

कराड येथून भाजीपाला खरेदी करून रात्री 10च्या सुमारास आर्वीकडे जात असताना कराड-पुसेसावळी मार्गावरील वाघेरी (ता. कराड) गावच्या हद्दीत बोलेरोला तवेरा गाडी आडवी मारून दीपक इंगळे, संदीप इंगळे व अनोळखी दोघांनी रमेशला गाडीतून बाहेर ओढून त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर दीपकने तलवारीने रमेशवर सपासप वार केले. संदीप आणि अन्य दोन अज्ञातांनी रमेशला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात रमेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता.

24 तासांत संशयितांना केले जेरबंद -

रमेश पवार याच्या खूनप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत चारही संशयीतांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी शशिकांत काळे, अमित पवार, सज्जन जगताप यांनी 24 तासांत हत्येच्या गुन्ह्यातील संशयितांना जेरबंद केले.

हेही वाचा -धक्कादायक : प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details