महाराष्ट्र

maharashtra

ऐतिहासिक चित्रपटांवरुन खासदार उदयनराजेंनी अमित शाहांकडे 'ही' केली मागणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 2:14 PM IST

Updated : Dec 29, 2023, 4:27 PM IST

MP Udyanraje Bhosale Demand : भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची गुरुवारी दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर कमिटी स्थापन करण्यासह अनेक मागण्या केल्या आहेत.

खासदार उदयनराजे भोसले
खासदार उदयनराजे भोसले

सातारा MP Udyanraje Bhosale Demand : खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेऊन महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. महापुरुषांचा अवमान केल्यास कडक शिक्षेच्या तरतुदीचा कायदा पारीत करावा, तसंच ऐतिहासिक घटनांवर आधारीत चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केली जाते. अशा चित्रपटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर कमिटी स्थापन करावी, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केलीय.

'शिवस्वराज्य' सर्किट विकसित करावं : या भेटीत खासदार उदयनरादेंनी स्वदेश योजनेंतर्गत बुद्ध सर्किट, रामायण सर्किटच्या धर्तीवर 'शिवस्वराज्य' सर्किट विकसित केलं जावं, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात पर्यटन मंत्रालयाला आपल्या स्तरावरुन सूचना निर्गमित करण्याची विनंती केलीय. केंद्र सरकारच्या वतीनं 'शिवस्वराज्य' सर्किट विकसित झाल्यास मराठयांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणं जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येतील. शिवरायांचा अधिकृत इतिहास राज्य शासनामार्फत प्रसिध्द करण्यात यावा. ऐतिहासिक चित्रफिती किंवा चित्रपटांना सेन्सॉर बोर्डानं परवानगी देताना इतिहास तज्ज्ञांच्या कमिटीची मान्यता घेण्याचं बंधन घालावं, अशा मागण्या उदयनराजेंनी अमित शाहांकडे केल्या आहेत.

परदेशातील दस्तावेज भारतात आणावेत : छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्टयपूर्ण स्मारक उभारण्याचं काम केंद्र सरकारनं हाती घ्यावं. ऐतिहासिक कालखंडातील प्रसंगांचं अधिकृत मुल्य ठरवण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमावी, पुरातत्व विभागाच्या वतीनं प्रसिध्द झालेल्या आणि अप्रसिध्द राहिलेले दस्तावेज, चित्रं, शस्त्रागाराचा नव्यानं अभ्यास करुन अधिकृत इतिहास शासनानं प्रसिद्ध करावा. तसंच विदेशात सापडलेले ऐतिहासिक दस्तावेज भारतात आणण्यसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उदयनराजेंनी केलीय.


महापुरुषांची बदनामी करणार्‍यांना कडक शिक्षेचा कायदा करावा :महापुरुषांची बदनामी करुन समाजात दुफळी निर्माण केली जाते. त्यामुळं जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन समाजस्वास्थ्य बिघडते. तसंच यामुळं कायदा व सुसव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं महापुरुषांची बदनामी करणार्‍यांना जबर शिक्षेच्या तरतुदीचा कायदा संसदेत पारित करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजेंच्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation : आरक्षण प्रश्नावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; 'जनगणना होईपर्यंत निवडणुका घेऊ नका'
  2. महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी
Last Updated :Dec 29, 2023, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details