महाराष्ट्र

maharashtra

Satara Kas Pathar : कास पठारावरील पर्यटन हंगाम सुरू, फुलांच्या क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश बंदी

By

Published : Jul 31, 2022, 5:22 PM IST

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर ( World Heritage Site Kas pathar ) पावसाळी पर्यटन हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत कास दर्शन सेवा सुरू झाली आहे. पर्यटकांना 30 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार असून फुलांच्या क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

Kas pathar
कास पठार

सातारा -सध्या कास पठार विविध फुलांनी बहरलेला आहे. त्यामुळे राज्यभरातून नव्हे तर देशभरातून पर्यटक कास पठार पाहण्यासाठी दाखल होत आहेत.जागतिक वारसा स्थळ ( World Heritage Site Kas pathar ) असलेल्या कास पठारावर पावसाळी पर्यटन हंगामाला प्रारंभ ( monsoon tourism season on Kas pathar ) झाला आहे. त्याअंतर्गत पर्यटनासाठी निसर्ग प्रमींना कास दर्शन सेवा सुरू झाली आहे. पर्यटकांना 30 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार असून फुलांच्या क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली ( Tourists prohibited in flower area ) आहे.

कास पठारावरील अनेक पाईंट दुर्लक्षित -निसर्गाचा अद्भूत खजिना असलेल्या कास पठारावरील दुर्मिळ वनस्पती, विविध जातींच्या फुलांमुळे पठार जागतिक वारसा स्थळ ठरले ( Rare plants flowers found on Kas pathar ) आहे. विस्तीर्ण कास पठारावरील मंडपघळ, प्राचीन गुहा, कुमुदनी तलाव, सज्जनगड पॉईंटसारखे अनेक पर्यटन पॉईंट्स दुर्लक्षित आहेत. लाकडी मनोर्‍यावरून दिसणारा कास तलावाचा जलशय, छोटे छोटे धबधबे पाहण्याची संधी पर्यटकांना पर्यटन हंगामात मिळणार आहे.

कास परिसर दर्शन सेवा सुरू -गेल्या वर्षी पर्यटन हंगाम कालावधीमध्ये कास परिसर दर्शन सेवा सुरू करण्यात आली होती. यंदाही ती सुरू करण्याचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीने ( Kas pathar Executive Committee ) घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. 1 ऑगस्ट) ही सेवा सुरू होत आहे. कास परिसर दर्शन सेवेमध्ये सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास असून त्यासाठी समितीने खरेदी केलेल्या गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक गाडीमागे चार हजार रुपये भाडे आकारले जाणार असून गाडीमध्ये आठ पर्यटकांना बसता येईल. कास पठार ते घाटाई देवराई, वांजुळवाडीमार्गे कास तलाव, कास तलावावरून तांबी इथून वजराई धबधबा ते परत अंधारी सह्याद्रीनगरच्या पवनचक्क्या, वेण्णा नदी, एकीव धबधबा, अटाळीच्या नवरा नवरी डोंगर दर्शनाचा या सफारीत समावेश आहे.

हेही वाचा -MP Navneet Rana On Sanjay Raut : महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राऊत एजंट होते; नवनीत राणा यांचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details