महाराष्ट्र

maharashtra

Satara Gram Panchayat Election : सहापैकी प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींवर शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व...

By

Published : Sep 20, 2022, 9:59 AM IST

Satara Gram Panchayat Elections
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक ()

जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले (Shinde group and NCP dominated gram panchayats) आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंना प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता आणण्यात यश आले (Maharashtra Gram Panchayat Election Result) आहे.

सातारा -जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले (Shinde group and NCP dominated gram panchayats) आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंना प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता आणण्यात यश आले (Maharashtra Gram Panchayat Election Result) आहे.



दोन ग्रामपंचायती शिंदे गटाकडे -जिल्ह्यातील सर्वात मोठी सातारा शहराजवळच्या खेड ग्रामपंचायतीत शिंदे गटाने सत्तांतर घडवले. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे यांच्या गटाने १२/५ अशा फरकाने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले. गोजेगाव ग्रामपंचायतीवर देखील शिंदे गटाने भगवा फडकवला आहे. आमदार महेश शिंदेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दोन ग्रामपंचायती (Grampanchayat Election 2022) मिळाल्या.



राष्ट्रवादीचीही दोन ग्रामपंचायतींवर सत्ता -सातारा जिल्ह्यातील सहापैकी दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या पॅनेलने चिंचनेर (निंब) आणि खिंडवाडी या ग्रामपंचायतीवर सत्ता राखली (Satara Gram Panchayat Election) आहे.



दोन्ही राजेंना समान यश -खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाला समान यश मिळाले आहे. संभाजीनगर ग्रामपंचायत निवडणुकीत उदयनराजे गटाने बाजी मारली तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने उपळी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. शिवेंद्रराजेंनी उपळी ग्रामपंचायतीत ७ पैकी ४ जागा बिनविरोध केल्या होत्या. दोन जागांवर लागलेल्या निवडणुकीत त्यांच्याच विचारांचे उमेदवार विजयी झाले. एका जागेवर ओबीसी आरक्षण असल्याने त्या जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक झालेल्या सर्व जागांवर शिवेंद्रराजेंच्या गटाचे उमेदवार विजयी झाले. (Maharashtra Politics)

ABOUT THE AUTHOR

...view details