महाराष्ट्र

maharashtra

अतिवृष्टीमुळे सातारा-कास रस्ता खचला, वाहतूक बंद

By

Published : Aug 7, 2019, 11:17 AM IST

महाबळेश्वर आणि कास पठाराला पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपले असल्याने पर्यटक आणि स्थानिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

खचलेला रस्ता

सातारा -मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. आज अटाळी गावानजीक हॉटेल हेरिटेजवाडीच्या जवळील सातारा-कास रस्ता खचला. त्यामुळे हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला. कास पठार समिती घटना स्थळी दाखल झाली असून खबरदारी घेतली जात आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर पूर्व भागात आज ही ८५ चारा छावण्या व १७८ पाणी टँकर चालू आहेत. महाबळेश्वर आणि कासला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपले असल्याने पर्यटक आणि स्थानिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

Intro:सातारा :- मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर पूर्व भागात आज ही 85 चारा छावण्या व 178 पाणी टँकर चालू आहेत. महाबळेश्वर आणि कासला मोठ्याप्रमाणात पावसाने झोडपले असल्याने पर्यटक आणि स्थानिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.Body:आज सकाळी कास नजीक असलेल्या अटाळी गावानजीक हॉटेल हेरिटेजवाडीच्या जवळ असलेला सातारा-कास रस्ता खचला असून वाहतूक धोकादायक झाल्याने रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. कास पठार समिती घटना स्थळी दाखल झाली असून खबरदारी घेतली जात आहे. Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details