महाराष्ट्र

maharashtra

राज्याने उठसूट केंद्रावर आरोप करणे बंद करावे - सदाभाऊ खोत

By

Published : Apr 9, 2021, 8:35 PM IST

राज्य सरकारने उठसूट केंद्रावर आरोप करणे बंद करून, स्वतःच्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यावे, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केलेल्या लसीकरण उत्सवाचा राज्य सरकारने फायदा करून घ्यावा, असे आवाहन देखील खोत यांनी केले आहे.

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

सांगली -राज्य सरकारने उठसूट केंद्रावर आरोप करणे बंद करून, स्वतःच्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यावे, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केलेल्या लसीकरण उत्सवाचा राज्य सरकारने फायदा करून घ्यावा, असे आवाहन देखील खोत यांनी केले आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते.

राज्याने उठसूट केंद्रावर आरोप करणे बंद करावे

'आधी आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्या, मग आरोप करा'

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 11 ते 14 एप्रिलदरम्यान लसीकरण उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हा खरोखर स्तुत्य उपक्रम असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे. आज राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेकडे पुरेशे मनुष्यबळ नाही, स्वतःच्या आरोग्य यंत्रणेकडे व रुग्णांकडे लक्ष नाही, आणि ऊठसूट केंद्रावर आरोप करण्यात येत आहेत, अशी टीका यावेळी खोत यांनी केली आहे. तसेच आधी आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्या, मग केंद्रावर आरोप करा असा सल्लाही यावेळी खोत यांनी राज्य सरकारला दिली आहे.

हेही वाचा -इतर राज्यात वाया गेलेल्या लस महाराष्ट्राच्या नावाने खपवल्या जातायत, आरोग्यमंत्री संतापले

ABOUT THE AUTHOR

...view details