महाराष्ट्र

maharashtra

भेळ खाण्याचे आमिश दाखवून दोन मुलींवर बलात्कार; फलटण तालुक्यातील प्रकार

By

Published : Jul 30, 2021, 7:39 PM IST

दोन लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फलटण पोलिसांनी अटक केली. धनंजय बाजीराव गायकवाड (२८)असे आरोपीचे नाव असून तो चालक म्हणून काम करतो.

rape on two girl in satara
भेळ खाण्याचे आमिश दाखवून दोन मुलींवर बलात्कार

सातारा -भेळ खायला देण्याचे अमिश दाखवून दोन लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फलटण पोलिसांनी अटक केली. धनंजय बाजीराव गायकवाड (२८)असे आरोपीचे नाव असून तो चालक म्हणून काम करतो. फलटण तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारा हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

अमिश दाखवत घृणास्पद प्रकार -

२७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने पीडित दोन्ही मुलींना तुम्हाला भेळ खायला देतो, असे म्हणत त्याच्या राहत्या घरात नेले. तेथे त्याने दोघींवरही बलात्कार केला. यातील एक बालिका आठ, तर दुसरी मुलगी चार वर्षांची आहे. या प्रकाराने घाबरलेल्या दोघीही रडू लागल्यानंतर त्याने त्यांना सोडून दिले. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगायचे नाही, असा दमही त्याने दोन्ही बालिकांना दिला.

संशयित युवक अटकेत -

यामधील एका पीडित मुलीचे वडील पंढरपूर येथे गाडी घेऊन गेले होते. ते घरी परत आल्यानंतर पीडितेच्या आईने त्यांना हा प्रकार सांगितला. वडीलांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली असल्याचे फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भारत किंद्रे यांनी सांगितले. या नराधमास आज सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'ही' तर प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा, उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला सुनावले

ABOUT THE AUTHOR

...view details