महाराष्ट्र

maharashtra

'आमच्या लेकरांच्या पाठीशी उभे राहा, अन्यथा आयुष्यभर..; मनोज जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 4:40 PM IST

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. (Manoj Jarange Patil Karad Meeting) यामध्ये त्यांनी मराठ्यांच्या लेकरांच्या पाठीशी उभे राहिला नाही तर ही लेकरं आयुष्यभर तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, असा इशारा सर्वपक्षीय मराठा नेत्यांना दिला. (Jarange Patil appeal to Maratha leaders)

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील

मराठा नेत्यांना खणखणीत इशारा देताना मनोज जरांगे पाटील

सातारा Manoj Jarange Patil :कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या सभेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात चांगलंच रान पेटवलं. (Maratha reservation issue) आज आमच्या लेकरांच्या पाठीशी उभे राहा. (Manoj Jarange Patil taunt to Chhagan Bhujbal) नाही राहिलात तर ही लेकरं आयुष्यभर तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, असा खणखणीत इशारा जरांगे-पाटील यांनी सर्वपक्षीय मराठा नेत्यांना दिला. (Manoj Jarange Patil)


रात्री १ वाजता सभेला सुरुवात:रात्री आठची सभा १ वाजता सुरू झाली. तरीही कडाक्याच्या थंडीत हजारो लोक जरांगे पाटील यांची पाच तास वाट पाहत होते. ते म्हणाले की, आज मराठ्यांच्या लेकरांवर वेळ आली आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहा. मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही; पण पाठीशी राहिला नाहीत तर हाच मराठा आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही.


ओबीसींच्या अंगावर जाऊ नका :ग्रामीण भागातील मराठा आणि ओबीसी समाज आजही एकमेकांच्या सुख-दुःखात उभा राहतो. मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जायचं नाही. कुणी कितीही उचकवलं तरी उचकू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं. चारी बाजूनं विषारी विचार पसरवण्याचं काम सुरू झालं असल्याचा आरोपही त्यांनी छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळून केला.

'त्या' बिचाऱ्याचं खूप वय झालंय :त्या बिचार्‍याचं वय खूप झालंय. त्यामुळे ते काही पण बोलायला लागलेत. उद्यापासून त्यांना महत्त्व द्यायचं नाही, असा टोला जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना लगावला. ते म्हणाले, मराठा समाज आरक्षणात गेला आणि आरक्षणाची ७० टक्के लढाई जिंकलीसुद्धा, हे त्यांना कळलंय. त्यामुळे राजकीय स्वार्थापोटी मराठा आरक्षणाला विरोध करण्याचा घाट घातलाय. त्यांचं ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही.


भुजबळांनासुद्धा मराठ्यांनीच मोठं केलं :छगन भुजबळ यांचा समाचार घेताना जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ म्हणून व्यक्तीला आपला विरोध नाही. त्यांच्या विचारांना विरोध आहे. त्यांनी पातळी सोडल्यामुळे त्यांना किंमत द्यायची नाही. त्यांनासुद्धा मराठ्यांनीच मोठं केलंय. मराठा आरक्षणाच्या विरोधातील त्यांचे सगळे डाव हाणून पाडा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं.


सध्या जशास तसं उत्तर नाही :राज्यात, जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात साखळी उपोषण सुरू नाही, असं एकही गाव राहिलं नाही पाहिजे. ७० वर्ष न मिळालेलं आरक्षण आपण शांततेच्या मार्गानं आंदोलन करून निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलंय. हे शांततेचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद देशात कोणातच नाही. त्यामुळे सध्या जशास तसं उत्तर द्यायचं नाही. त्यांना जरा दमून द्या. काय-काय करतात बघा, असा सल्लाही जरांगे-पाटील यांनी दिला.

हेही वाचा:

  1. क्रिकेट विश्वचषकाची फायनलही भारतच जिंकणार - आशिष शेलार
  2. 16 जूनपासून मुंबईत पाणी महागणार? 1 डिसेंबरच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
  3. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना झाली मुन्नाभाई एमबीबीएसची आठवण; वाचा काय आहे प्रकरण?

ABOUT THE AUTHOR

...view details