महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : 'कौन बनेगा करोडपती'मधील भोंदूगिरीचा 'अंनिस'ने केला भांडाफोड!

By

Published : Nov 18, 2021, 8:19 PM IST

Updated : Nov 18, 2021, 8:28 PM IST

कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्कार दाखवण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी या गोष्टीचे कौतुक केल्यामुळे चुकीच्या आणि भोंदूगिरीचा प्रचार समाजात झाला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(maharashtra andhashraddha nirmoolan samiti)ने यावर जोरदार आक्षेप घेतला असून महाअंनिसमार्फत कथित चमत्काराच्या मागची हातचलाखी दाखवणारा व्हिडिओ (VIDEO) रिलीज करण्यात आला आहे.

कौन बनेगा करोडपती 2021
कौन बनेगा करोडपती 2021

सातारा -कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati)या शोमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्कार दाखवण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी या गोष्टीचे कौतुक केल्यामुळे चुकीच्या आणि भोंदूगिरीचा प्रचार समाजात झाला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(maharashtra andhashraddha nirmoolan samiti)ने यावर जोरदार आक्षेप घेतला असून महाअंनिसमार्फत कथित चमत्काराच्या मागची हातचलाखी दाखवणारा व्हिडिओ (VIDEO) रिलीज करण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांना अंनिसचे आवाहन

१६ नोव्हेंबर रात्री आणि १७ नोव्हेंबर सकाळी 'कौन बनेगा करोडपती'चा एपिसिड रिलीज झाला. या शोमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्कार प्रयोग दाखवण्यात आला. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हा कथित चमत्कार दाखवल्यामुळे आणि त्यांनी या गोष्टीचे कौतुक केल्याने अत्यंत चुकीच्या आणि भोंदूगिरीच्या गोष्टीचा प्रचार समाजात केला गेला. अंनिसच्या व्हिडिओमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून वाचन करणारे महाअंनिसचे कार्यकर्ते दाखवण्यात आले आहेत. विज्ञानाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या या भोंदूगिरीला पालकांनी बळी पडू नये तसेच कौन बनेगा करोडपती या शो ने घडलेल्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रत्यक्षात या कथित चमत्काराच्या मागचे विज्ञान शोमधून लोकांच्या समोर दाखवावे, असे आवाहनदेखील महाराष्ट्र अंनिसमार्फत हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी केले आहे.

विज्ञानाच्या नावावर हातचलाखी

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली चूक दुरुस्त करावी आणि अशा अवैज्ञानिक गोष्टीं(unscientific things)ना आपल्या शोमध्ये थारा देवू नये, असेदेखील आवाहन या वेळी करण्यात आले आहे. डोळ्यावर पट्टी बांधून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात तसेच अनेक राज्यांत मुलांचे 'मिड ब्रेन अक्टीव्हेशन' करून त्यांचा बुद्ध्यांक तसेच स्मरणशक्ती वाढवतो, असे दावे करणाऱ्या मार्गदर्शन वर्गांचे पेव फुटले आहे. मिड ब्रेन(मध्य मेंदू)चे उद्दीपन केल्याने डोळ्यावर पट्टी बांधूनदेखील मुलांना केवळ स्पर्शाने अथवा वासाने गोष्टी ओळखता येतात, असा यांचा दावा आहे. विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुलांची व पालकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो, अशा भूलथापेला बळी पडून अनेक पालक हजारो रुपये खर्च करत आहेत. हे सर्व थांबवणे आवश्यक आहे, असे समितीचे म्हणणे आहे.

पट्टीमागे नेमके दडलेय काय?

डोळ्यावर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांच्यामध्ये जी जागा राहते त्यामधून बघून गोष्टी ओळखाल्या जातात. जर हाताने दाब देवून डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यांवर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर या गोष्टी ओळखता येत नाहीत हे अंनिसने अनेक वेळा सिद्ध केले आहे. आजूबाजूला पूर्ण अंधार करून अथवा डोक्याच्या मागच्या बाजूला वस्तू धरली असता 'मिड ब्रेन अक्टीव्हेशन'चे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत. तसेच अंध मुलांनादेखील मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे कितीही प्रशिक्षण दिले, तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाहीत, असे अंनिसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत याविषयी तक्रार दाखल करता येवू शकते का, याचादेखील कायदेशीर सल्ला महाअंनिस घेत असल्याचे अंनिसने सांगितले आहे.

Last Updated : Nov 18, 2021, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details