महाराष्ट्र

maharashtra

Prithviraj Chavan On Lokayukta Reform Bill : सत्ताधाऱ्यांनी अधिवेशन गुंडाळल्याने लोकायुक्त सुधार विधेयक पुन्हा चर्चेला यावे - पृथ्वीराज चव्हाण

By

Published : Jan 6, 2023, 11:05 PM IST

Prithviraj Chavan On Lokayukta Reform Bill

लोकायुक्त सुधार विधेयक (Lokayukta reform bill) घाईगडबडीत पारीत केले असून ते विधेयक विधान परिषदेत फेटाळले आहे. अशा प्रकारे विधेयके पारीत करणे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. त्यामुळे लोकायुक्त विधेयक पुन्हा चर्चेला यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत (Prithviraj Chavan press conference Karad) केली. (Latest news from Satara)

सातारा :लोकायुक्त विधेयक (Lokayukta reform bill) पुन्हा चर्चेला यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत (Prithviraj Chavan press conference Karad) केली. विरोधकांकडे अनेक प्रश्न होते. मात्र, त्यावर चर्चा करण्याची सत्ताधाऱ्यांची तयारी नव्हती. त्यामुळे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) सत्ताधाऱ्यांनी दोन आठवड्यात गुंडाळल्याचा आरोपही त्यांनी केला. (Latest news from Satara)

लोकायुक्त विधेयक पुन्हा चर्चेला यावे :लोकायुक्त सुधार विधेयक (Lokayukta reform bill) घाईगडबडीत पारीत केले असून ते विधेयक विधान परिषदेत फेटाळले आहे. अशा प्रकारे विधेयके पारीत करणे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. त्यामुळे लोकायुक्त विधेयक पुन्हा चर्चेला यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत (Prithviraj Chavan press conference Karad) केली. विरोधकांकडे अनेक प्रश्न होते. मात्र, त्यावर चर्चा करण्याची सत्ताधाऱ्यांची तयारी नव्हती. त्यामुळे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) सत्ताधाऱ्यांनी दोन आठवड्यात गुंडाळल्याचा आरोपही त्यांनी केला. (Latest news from Satara)


शिंदे सरकारवर टांगती तलवार :पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे. त्यांना अजुन मंत्रीमंडळ विस्तारही पुर्ण करता आलेला नाही. घटनेतील तरतुदीनुसार १० ब या परिशिष्टाचे त्यांनी उल्लंघन केले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल महत्वाचा ठरणार आहे. येत्या १३ तारखेला काय निर्णय होतोय, हे पहावे लागेल.


अर्थ व्यवस्थेवरील नियंत्रण सुटले :महाराष्ट्रातील प्रकल्प मोठ्या प्रमाणावर बाहेर जात आहेत. गुजरातला प्रकल्प का जात आहेत, याचे समाधानकारक उत्तर या सरकारला देता येत नाही, तर केंद्र सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले आहे. सध्या भारताने आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक कर्ज घेतले आहे. करामध्ये भरपूर वाढ करुन जनतेला लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.


मोदी चर्चा का करत नाहीत?चीनने भारताचा मोठा भुभाग लाटला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तसे काही घडलेलेच नाही. लोकसभेत चीनच्या अतिक्रमणाबाबत चर्चा करा म्हटले तर ते चर्चाही करीत नाहीत. देशाची अर्थव्यवस्था चांगली असल्याचे मोदी सांगतात. मात्र, दरडोई उत्पन्नाच्या यादीत भारत १७७ व्या क्रमांकावर असल्याचे ते का सांगत नाहीत, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details