महाराष्ट्र

maharashtra

कोविडमुळे कास राहणार पर्यटकांना बंद ? नानाविध फुलांचा बहर जाणार टिपेला

By

Published : Sep 16, 2020, 6:49 PM IST

हे पठार पर्यटनासाठी खुले करावे की नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल, असे वनविभागाने म्हटले आहे. कास खुले करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. यंदा कासला पर्यटकांचा प्रवेशबंदच राहण्याची शक्यता प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

मानवी हस्तक्षेप थांबल्याने जैवविविधतेला अनुकूल स्थिती
मानवी हस्तक्षेप थांबल्याने जैवविविधतेला अनुकूल स्थिती

सातारा - कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे पर्यटकांना कास पठार खुले करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी नाही. कास पठार खुले होण्याची शक्यता धूसर आहे. पर्यटकांसाठीच्या लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम कासच्या तसेच एकूणच पर्यावरणावर होईल, असे निरीक्षण कोल्हापूरचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डाॅ. मधुकर बाचूळकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नोंदवले.

कास पठार - मानवी हस्तक्षेप थांबल्याने जैवविविधतेला अनुकूल

जागतिक निसर्ग वारसा स्थळाचे कोंदण लाभलेल्या कास पठारावरील रानफुलांच्या मोसमाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या उघडीपीनंतर पडलेल्या उन्हामुळे कास पठारावर जगातील अलौकिक रानफुले डोकवायला सुरवात होते. कासकडे जाताना वाटेत यवतेश्‍वरपासून पुढे, रस्त्याच्या दुतर्फा पिवळ्या रंगाची छोटी सोनकीची फुलं आपले स्वागत करतात. पठारावर पोचल्यानंतर तेरड्याच्या फुलांचा जागोजागी जणू सडाच पडलाय, असा भास पाहणाराला होतो. निळ्या- पांढऱ्या रंगाची सीतेची आसवं, पांढऱ्या रंगाची गेंद, तुतारी, चवर (रानहळद), गवती दवबिंदू, नीलिमा, अबोली, सोनकी, महाकाली, आभाळी, नभाळी आदी ३० ते ३५ प्रकारची फुले पाहायला मिळत आहेत. दुर्गा उत्सवानंतर कासचा बहर टिपेला जाईल, असे तेथील स्थानिकांनी सांगितले.

मानवी हस्तक्षेप थांबल्याने जैवविविधतेला अनुकूल स्थिती
फुलांच्या रंगोत्सवाला सुरुवात झाली असली तरी कोविड - १९ मुळे यंदा पर्यटन हंगामाला फटका बसला आहे. साधारण १ सप्टेंबरला कासचा पर्यटन हंगाम वनविभागाच्या अखत्यारीमधील कास कार्यकारी समिती सुरू करते. कोविड साथरोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कासबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कास पठारावरील सर्व पायवाटा, कुमोदीनी तळ्याकडे जाणारा राजमार्ग पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आला आहे. गेल्या ५ महिन्यांत लाॅकडाऊनला कंटाळलेले पर्यटक पठारावर तुरळक प्रमाणात, 'वीकएंड'ला येत असले तरी त्यांना मुख्य रस्त्यावरूनच दुरूनच फुलांचे दर्शन घेऊन परतावे लागत असल्याने त्यांचा भ्रमनिरास होत आहे.
मानवी हस्तक्षेप थांबल्याने जैवविविधतेला अनुकूल स्थिती
हे पठार पर्यटनासाठी खुले करावे की नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल, असे वनविभागाने म्हटले आहे. कास खुले करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. तथापि, यंदा कासला पर्यटकांचा प्रवेश बंदच राहण्याची शक्यता प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.लाॅकडाऊन निसर्गाला पोषककोविडमुळे झालेल्या लाॅकडाऊनचे परिणाम निसर्गासाठी उपकारकच ठरले असल्याचे मत कोल्हापूर येथील वनस्पती तज्ज्ञ डाॅ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केले. "पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आपण आजवर पाहिले. अलीकडचे पर्यटन पर्यावरणपूरक राहिलेलं नाही. लाॅकडाऊनमुळे हा हस्तक्षेप रोखला गेला. त्यामुळे जैवविविधतेला पोषक वातावरण मिळत आहे. वन्यजीवांना निसर्गातील मुक्त संचाराला संधी मिळाली. हवा,पाणी स्वच्छ झाले. केवळ कासचं नव्हे तर एकूणच निसर्गाच्या निकोप वाढीला आवश्यक असलेले वातावरण तयार झाले आहे. पर्यटन बंदीचा एकूणच पर्यावरणाला निश्चित फायदा होईल," असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details