महाराष्ट्र

maharashtra

Suicide in Satara : सेमी इंग्लिश नको म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या; साताऱ्यात शुक्रवारी पाच जणांच्या आत्महत्या

By

Published : Jan 29, 2022, 1:13 PM IST

Updated : Jan 29, 2022, 3:35 PM IST

सातारा आणि कराड तालुक्यात शुक्रवारी पाच जणांनी आत्महत्या केल्या. ( Five People Suicide in Satara ) सातार्‍यातील एका विद्यार्थिनीने सेमी इंग्लिश नको म्हणून जीवन संपवले आहे तर मलकापुरातील शालेय मुलीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. ( Suicide in Satara )

five people suicide in satara on friday 28 january 2022
साताऱ्यात शुक्रवारी पाच जणांच्या आत्महत्या

सातारा -जिल्हा आत्महत्येच्या घटनांनी हादरला आहे. सातारा आणि कराड तालुक्यात शुक्रवारी पाच जणांनी आत्महत्या केल्या. ( Five People Suicide in Satara ) सातार्‍यातील एका विद्यार्थिनीने सेमी इंग्लिश नको म्हणून जीवन संपवले आहे तर मलकापुरातील शालेय मुलीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. ( Suicide in Satara ) तसेच कराडजवळच्या जखिणवाडीत गावातील एका विवाहित महिलेनेही विहिरीत उडी मारून आत्महत्या ( Woman Suicide in Karad ) केली आहे.

सेमी इंग्लिश नको म्हणून आत्महत्या -

सातार्‍यातील धुमाळ आळी परिसरात राहणार्‍या एका शाळकरी मुलीने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. घरात एकटी असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेमी इंग्लिश नको, म्हणून तिने आत्महत्या केल्याचे कारण तपासात पुढे आले आहे.

मलकापूरातही शाळकरी मुलीने घेतला गळफास -

कराड तालुक्यातील मलकापूर येथेही शुक्रवारी दुपारी शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आई व आजी-अजोबा लग्नाला बाहेरगावी गेलेले होते. लग्नाहून आल्यानंतर आजोबांना तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. राहत्या घरात कोणी नसताना तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

हेही वाचा -अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

विवाहितेसह आणखी दोघांची आत्महत्या -

शुक्रवारचा दिवस कराड तालुक्यासाठी घातवार ठरला. शाळकरी मुलीसह एक विवाहिता आणि दोन वृध्दांनी आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. मलकापूरमधील अहिल्यानगर भागात राहणार्‍या राजाराम मारूती येडगे (वय 61) या वृध्दाने शुक्रवारी सकाळी साडे सातच्या सुमारास पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर टेंभू (ता. कराड) येथील चंद्रकांत दिनकर वर्पे (वय 58) यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच जखिणवाडी (ता. कराड) येथील विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

हेही वाचा - Girls Commits Suicide kolhapur : कोल्हापुरात दोन तरुणींची आत्महत्या; एकीची शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून तर दुसरीची प्रियकराच्या...; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

Last Updated :Jan 29, 2022, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details