महाराष्ट्र

maharashtra

Bee Attack at Satara : मधमाशांच्या हल्ल्यात मुलाचा दरी पडून मृत्यू

By

Published : Apr 24, 2022, 7:27 PM IST

Updated : Apr 24, 2022, 8:32 PM IST

सातारा तालुक्यातील शिवाजीनगर येथे डोंगरावर ग्रामदैवत शिलनाथाची यात्रा सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्याने ( Bee Attack at Satara ) हलकल्लोळ उडाला. यात जीवाच्या भितीने पळताना पाय घसरुन दरी पडल्याने 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला ( A Child Falls into a Ravine ) आहे. सोमेश्वर विलास कदम, असे त्या मुलाचे नाव आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

सातारा - ग्रामदेवतेची यात्रा सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्याने ( Bee Attack at Satara ) हलकल्लोळ उडाला. यात जीवाच्या भितीने पळताना पाय घसरुन दरी पडल्याने 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला ( A child falls into a ravine ) आहे. तर 7 ते 8 ग्रामस्थ माशा चावल्याने जखमी झाले.

माहिती देताना ग्रामस्थ

मधमाशांनी केला हल्ला -सोमेश्वर विलास कदम (वय 13 वर्षे, रा. तारळे, ता. पाटण) हा मामाच्या गावी शेरेवाडी (ता. सातारा) येथे आला होता. सातारा तालुक्यातील शिवाजीनगर येथे डोंगरावर ग्रामदैवत शिलनाथाची यात्रा आजपासून सुरू झाली आहे. अचानक मधमाशांनी जमलेल्या लोकांवर हल्ला केला.

यापूर्वीही मधमाशांचा हल्ला -जीवाच्या भितीने लोक डोंगरावर सैरावैरा धावायला लागले. धावताना सोमेश्वरचा पाय घसरुन तो जवळच्या दरीत कोसळला. ग्रामस्थ आणि शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन दरीत पडलेल्या मुलाला बाहेर काढले. मात्र, त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. मधमाशा चावल्याने इतर 7 ते 8 ग्रामस्थ जखमी झाले. त्यात सहा मुलांचा समावेश आहे. जखमीतील काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी यात्रे दरम्यानच मधमाशांनी चावा घेण्याची घटना घडली होती. मात्र, त्यात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता.

हेही वाचा -VIDEO : दोन वर्षांनंतर भरलेल्या कराडच्या कृष्णामाई चैत्र यात्रेला भाविकांची अलोट गर्दी, पाहा व्हिडिओ...

Last Updated :Apr 24, 2022, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details