महाराष्ट्र

maharashtra

Young Death Due to Electric Shock In Sangli: बांधकामाला पाणी देताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

By

Published : Jan 22, 2023, 4:26 PM IST

घराच्या बांधकामाला मोटरच्या साह्याने पाणी देत असताना पाण्यामध्ये विद्युत प्रवाह आल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी संतोष आबासाहेब माने (रा. मानेवस्ती, जत, वय १७ वर्षे) याचा शुक्रवारी जागीच मृत्यू झाला. विजेचा धक्का लागल्याने संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळला.

Young Death Due to Electric Shock In Sangli
विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

सांगली :मुलगा बेशुद्धावस्थेत पडला असल्याचे कळाल्याने वडिलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे वडील आणि शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

नागरिकांची हळहळ :डॉक्टरांनी या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे जत पोलीस ठाण्याला कळविली. त्यानंतर पोलीस पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत संतोष हा कवठेमहांकाळ शहरातील आय.टी.आय. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत होता. सुट्टीच्या दरम्यान तो घरी आला होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेची जत पोलीस स्टेशन येथे नोंद झाली आहे. या घटनेने मृताच्या वस्तीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू :खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील तिफनवाडी व परिसरात रात्री १२ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत शेतीसाठी विद्युत पुरवठा करण्यात येत होता. उन्हाळी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या शेतात डौलत असून वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू होती. तिफनवाडी येथे शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अविनाश काशिनाथ कडलग (वय 42) असे या शेतकऱ्याचे नाव होते.

मोटार पंपाच्या बाजूला प्रेतच आढळले :शेतकऱ्यांच्या चर्चेनुसार, तिफनवाडी येथील शेतकरी अविनाश कडलग 2 मे 2021 रोजी हे पहाटे पाच वाजता आपल्या शेतीतील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र, खूप वेळ ते परत घरी न आल्याने त्यांची पत्नी सुवर्णा या शेताकडे त्यांना पाहण्याकरता आल्या. त्यावेळी अविनाश मोटर पंपाच्या बाजूला पाण्यात पडलेले त्यांना आढळले. झालेल्या घटनेबाबत त्यांनी तातडीने गावचे पोलीस पाटील व परिसरातील नागरिकांना कळवले. अविनाश यांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने मुख्य वीजप्रवाह बंद करून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

हेही वाचा :Maharashtra Kesari Wrestler Fight : दोन महाराष्ट्र केसरी पैलवानात झूंज, पंचवीस मिनिटे चाललेली झुंज ठरली बरोबरीत

ABOUT THE AUTHOR

...view details