महाराष्ट्र

maharashtra

सांगलीच्या वाळव्यामध्ये दोन गटात तुंबळ राडा, 4 ते 5 जण जखमी

By

Published : Feb 13, 2021, 4:58 PM IST

किरकोळ वादातून सांगलीच्या वाळव्यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे.

सांगलीत दोन गटात तुंबळ राडा

सांगली - किरकोळ वादातून सांगलीच्या वाळव्यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यामध्ये तलवार हल्ल्यात एक जवानासह दोन्ही गटाचे 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. तर या तुंबळ मारामारीमध्ये जवानाच्या घराची प्रचंड नासधूस करण्यात आली आहे.

सांगलीच्या वाळव्यामध्ये दोन गटात तुंबळ राडा
दोन गटात तुंबळ हाणामारी-वाळवा या ठिकाणी दोन गटांमध्ये तुफान राडा हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. एकमेकांकडे बघण्याचा वादातून हा राडा झाला आहे. गावातील जवान रणजित फाटक आणि अहिरे कुटुंबात ही मारामारी झाली. दोन्ही गटाच्या वीस ते पंचवीस जणांचा जमावामध्ये तूंबळ हाणामारी झाली आहे. अहिरे गटाकडून जवान फाटक यांच्या घराची प्रचंड नासधूस करण्यात आलेली आहे. या मारामारी दरम्यान तलवारीचाही वापर झाला असून झालेल्या हल्ल्यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये जवान फाटक यांचाही समावेश आहे. तर राड्यामध्ये हवेत गोळीबार झाल्याची अफवा पसरली आहे.

जखमी शासकीय रुग्णालयात दाखल-

दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटाच्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमध्ये गोळीबार झाला नसल्याचा दावा पोलिसांच्याकडून करण्यात आलेला आहे. मात्र या राड्यामुळे वाळवामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा-कर्जबाजारीपणामुळे नवऱ्याने केली आत्महत्या; बायकोला हाकावा लागतोय कुटुंबाचा गाडा

ABOUT THE AUTHOR

...view details