महाराष्ट्र

maharashtra

Robbing Truck Driver : ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

By

Published : Dec 12, 2022, 6:08 PM IST

मिरज मार्गे ट्रकचालक कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीकडे जात असताना संशयित आरोपींनी ट्रक अडवून (Robbing Truck Driver) ट्रक चालक व त्याच्या साथीदाराला मारहाण केली. तसेच त्यांचाकडून रोख 2 हजार 250 रुपये व मोबाईल लुटण्यात आल्याची (Assets worth lakhs seized) घटना घडली होती. या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. (robbers arrested in Sangli) याप्रकरणी पोेलिसांनी ट्रकचालकांना लुटणाऱ्या (Robbing Truck Driver) टोळीला सांगलीच्या मिरज पोलिसांनी बेड्या ठोकल्या (robbers arrested in Sangli) आहेत.

Robbing Truck Driver
ट्रक ड्रायव्हर लुटमार प्रकरण

सांगली : ट्रक चालकांना लुटणाऱ्या (Robbing Truck Driver) टोळीला सांगलीच्या मिरज पोलिसांनी बेड्या ठोकल्या (robbers arrested in Sangli) आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करत 1 लाख 3 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Assets worth lakhs seized) केला आहे. (Latest news from Sangli) सागर बराले आणि अनिलसिंह रजपुत असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. (Sangli Crime)

ट्रकचालकाला लुटणाऱ्याला अटक

लुटमारीच्या घटनेने खळबळ :मिरज शहरानजीक 11 डिसेंम्बर 2022 रोजी म्हैशाळ रोडवर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. मिरज मार्गे ट्रकचालक कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीकडे जात असताना संशयित आरोपींनी ट्रक अडवून ट्रक चालक व त्याच्या साथीदाराला मारहाण केली. तसेच त्यांचाकडून रोख 2 हजार 250 रुपये व मोबाईल लुटण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली होती.

लुटमार प्रकरणी दोघांना अटक :याबाबत मिरज शहर पोलिसांच्याकडून गतीने तपास करण्यात आला होता आणि या लुटमार प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सागर बराले आणि अनिलसिंह रजपुत असे या संशयित चोरट्यांची नावे आहेत. दोघांनी या लूटमारीची कबुली दिली असून त्यांच्याकडून 2,200 रुपये रोख, एक मोबाईल आणि एक मोटरसायकल, असा एकूण 1 लाख 3 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन सावंत यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details