जत : जत शहरात चोऱ्या हा नित्याचाच भाग झाला आहे. यातून पोलीसांची निष्क्रीयता कायमच अधोरेखीत होत आहे. मंगळवारी तर पंचायत समितीच्या आवारातूनच तीन लाखांची बॅग चोरट्यांनी दिवसा ढवळ्या लांबवली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चोरीचा तपास करणे आता पोलीसां समोर मोठे आव्हान बनले आहे. अधिक माहीती अशी की, जत तालुक्यातील संख येथील ठेकेदार चंद्रशेखर परगोंडा बिरादार हे मंगळवारी जत येथे आले होते.
त्यांनी दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांचे सहकारी मित्र आयुब सय्यद यांना पैसे देण्यासाठी येथील एचडीएफसी बँकेतून तीन लाख रूपयांची रोकड काढली होती. पैसे घेवून ते आपल्या चारचाकी गाडीतून पंचायत समितीच्या आवारात गेले. तिथे गाडी लावून ते बोलत उभारले होते.याचवेळी त्यांच्या गाडीतील चालकास फोन आल्याने ते गाडीतून उतरून फोनवर बोलत कांही अंतर चालत गेले. तर चंद्रशेखर बिरादार हे गाडीच्या बाजूलाच मित्रांशी बोलत उभे राहीले होते.
याच वेळी अज्ञात चोरांनी याचा पुरेपूर फायदा घेत, बिराजदार यांच्या चारचाकी गाडीतील मागच्या बाजुला ठेवलेली पैशाची पिशवी हातोहात लांबवली. दोघे अज्ञात चोरटे मोटर सायकल वरून येवून त्यांनी कुणालाही कांही समजायच्या आत ही बॅग घेवून पाबोरा केला. विशेष म्हणजे ही घटना पंचायत समितीच्या आवारात घडली तर येथून जत पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. शासकीय कार्यालय व पोलीस ठाणे अशा भागातच चोरांनी तीन लाख लांबवल्याने चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी जत पोलीसांत चंद्रशेखर बिराजदार यांनी फिर्याद दिली आहे. तपास
हवालदार धुमाळ करत आहेत.
सांगली जिल्ह्यात तसेच जत तालूक्यात घरफोड्यांसह दुचाकी चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचा तपास करण्याबाबत पोलीस अधिक्षक बसवराज तेली, अपर अधीक्षक आँचल दलाल यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या. तेव्हा एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले होते. सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे पथक शहरात गस्तीवर होते. अंकली फाटा परिसरात एक संशयित बिना क्रमांकाच्या दुचाकीवर येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे सखोल चौकशी केली त्यावेळी त्याने स्वत:चे नाव तौफिक जमादार असे सांगितले. त्याच्याजवळील दुचाकीच्या कागदपत्रांची माहिती मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा. पोलिसांचा संशय बळावला पोलिसी खाक्या दाखवत त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या सॅकमध्ये चांदीच्या मूर्ती आणि मुद्देमाल आढळून आला होता.
हेही वाचा :Chandrahar Patil On Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय होतो- पैलवान चंद्रहार पाटील