महाराष्ट्र

maharashtra

थेट पोलीस मुख्यालयात चोरट्यांनी मारला डल्ला, यंत्रणेला चकवा देत चंदनाच्या झाडांची केली चोरी

By

Published : Jul 17, 2022, 2:42 PM IST

सांगलीच्या पोलीस मुख्यालयाच्या आवारात असणाऱ्या ट्राफिक पार्क या ठिकाणी चंदनाची अनेक झाडे आहेत. या झाडांच्यावर चोरट्यांचा डोळा हा नेहमीच राहिला आहे. यातूनच थेट पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी दोन भली मोठी चंदनाची झाडे चोरून नेली आहेत. करवतीने कापून दोन चंदनाच्या झाडांची बुंधे घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या बंगल्या शेजारीच हा ट्रॅफिक पार्क आहे.

theft of sandalwood trees from sangli police headquarters
चंदनाच्या झाडांची चोरी

सांगली -पोलीस मुख्यालयामध्येच चक्क चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेला चुकवा देत थेट चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. चार हजार रुपये किमतीचे दोन चंदनाचे झाडे तोडून पोबारा केला आहे. चंदन झाडांच्या चोरीचा हा दुसरा प्रकार पोलीस मुख्यालयामध्ये घडला आहे. तर या चंदन झाड चोरी प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.



चोरट्यांनी पोलिसांची सुरक्षा यंत्रणा भेदली - सांगलीच्या पोलीस मुख्यालयाच्या आवारात असणाऱ्या ट्राफिक पार्क या ठिकाणी चंदनाची अनेक झाडे आहेत. या झाडांच्यावर चोरट्यांचा डोळा हा नेहमीच राहिला आहे. यातूनच थेट पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी दोन भली मोठी चंदनाची झाडे चोरून नेली आहेत. करवतीने कापून दोन चंदनाच्या झाडांची बुंधे घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या बंगल्या शेजारीच हा ट्रॅफिक पार्क आहे. याआधीही एकदा चंदन चोरीचा प्रकार घडला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्याकडून ट्राफिक पार्कला पूर्ण बंदिस्त केले व भल्या मोठ्या बांधकामाचे कुंपण संपूर्ण पोलीस मुख्यालयाच्या आवाराला घातले आहे. मात्र तरी देखील चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर तुरा देऊन हे चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चंदन झाडांच्या चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details