महाराष्ट्र

maharashtra

आता एसटी कर्मचाऱ्यांची मंत्रालयावर धडक, मंत्रालयासमोर करणार आंदोलन - गोपीचंद पडळकर

By

Published : Nov 5, 2021, 10:37 AM IST

एसटीच्या विलिनीकरणासह एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता 10 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणार असल्याचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे.

sangli latest news
sangli latest news

सांगली -राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणासह एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता 10 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणार असल्याचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे. एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासह मंत्रालयाच्या दारात उघड्यावर संसार थाटणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.

'संकटात मराठी माणसाला वाऱ्यावर सोडण्याचा मराठी बाणा' -

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसात माझ्या 31 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील 3 जनांचे प्राण वाचले आहेत. पण तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांचे अश्रु पुसणे तर सोडा, साधे दोन ओळीचे सांत्वनाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही. मराठी माणसाच्या भरोश्यावरती आपले राजकारण करायचे आणि ते संकटात असताना त्यांना व त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडायचे. हाच यांचा मराठी बाणा आहे, अशी टीका पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

'आता मंत्रालयासमोर एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संसार' -

या ठाकरे सरकारच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावरतीच आणायचे असेल तर मी समस्त एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आता आपला संसार आपल्या पोरा-बाळांसहीत येत्या 10 नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या आवारातच उघड्यावर थाटू, असे आवाहन करत 10 नोव्हेंबर रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आता आत्महत्या न करता मंत्रालयाच्या दारातच संसार थाटू, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाच -आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळाही फुटणार - शिवसेना

ABOUT THE AUTHOR

...view details