महाराष्ट्र

maharashtra

केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी.. महाआघाडी व भाजप नेत्यांना दिवाळी करू देणार नाही - राजू शेट्टी

By

Published : Oct 3, 2021, 8:07 PM IST

Updated : Oct 3, 2021, 8:20 PM IST

raju shetti

राज्य व केंद्र दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. मात्र आम्ही यांना गुडघे टेकायला लावू आणि एक रकमी एफआरपी घेऊ, तसेच महाविकास आघाडी व भाजपामधील नेत्यांना दिवाळी करू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सांगली -एकरकमी एफआरपीवर आम्ही ठाम आहोत. मात्र केंद्र सरकारने तीन तुकड्यात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर कळस म्हणजे राज्य सरकार वर्षभरात तीन तुकड्यात एफआरपी देऊ, असे म्हणत आहे. खरं तर ही दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. मात्र आम्ही यांना गुडघे टेकायला लावू आणि एक रकमी एफआरपी घेऊ, तसेच महाविकास आघाडी व भाजपामधील नेत्यांना दिवाळी करू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये आज शिवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी
दोन्ही सरकार शेतकरी विरोधी -
पूरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारवर निशाणा साधताना राजू शेट्टी म्हणाले, सव्वा दोन महिने उलटून गेले मात्र अद्यापही पूरग्रस्तांना सरकारने मदत दिली नाही. आता केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रामध्ये येणार आहे. मला कळत नाही आता येऊन हे पथक काय पाहणार आहे. यांच्यावरून कळते केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत किती तळमळ आहे. तसेच राज्य सरकारची अद्यापही काही ठिकाणी मदत पोहचली नाही. आम्ही यासाठी जल समाधी आंदोलन सुद्धा केले. अजून काय करायचे ? म्हणजे सरकारला पाझर फुटणार आहे आणि सरकार मदत करणार आहे, असा सवालही शेट्टी यांनी सरकारला केला. तसेच आमची दिवाळी जर शिमगा करत जाणार असेल तर आम्ही महाविकास आघाडी व भाजपा नेत्यांची दिवाळी होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिली आहे.


हे ही वाचा -आभाळच कोसळले : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त, पाहा विशेष रिपोर्ट...

शेतीमालाला आधी भाव मिळला पाहिजे -

शेतकरी आत्महत्यांवर शेट्टी म्हणाले, उत्पादनापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकला जात आहे. तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि बँकांचा तगादा यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे चित्र बदलायचे असेल तर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी शेट्टी यांनी केली.

Last Updated :Oct 3, 2021, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details