महाराष्ट्र

maharashtra

para commando soldier martyred : सैन्यदलाच्या गाडीला टँकरनं चिरडलं; सांगलीच्या पॅरा कमांडो सुपुत्राला वीरमरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 11:39 AM IST

para commando soldier martyred : जबलपूरवरुन कर्तव्यावर बंगळुरुला जाणाऱ्या सैन्य दलाच्या वाहनाला टँकरनं जोरदार धडक दिली. या अपघातात सांगलीच्या पॅरा कमांडो हवालदार सुपुत्राला वीरमरण आलं. पोपट खोत असं या अपघातात वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर लोणारवाडी या त्यांच्या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

para commando soldier martyred
पॅरा कमांडो हवालदार पोपट खोत

सांगली para commando soldier martyred :सैन्य दलाच्या गाडीला टँकरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात सांगलीच्या पॅरा कमांडो सुपुत्राचा दुर्दैवी अंत झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना जबलपूर इथं मंगळवारी दुपारी घडली. पोपट खोत असं या अपघातात दुर्दैवी अंत झालेल्या सांगलीच्या पॅरा कमांडो सुपुत्राचं नाव आहे. पोपट खोत हे लोणारवाडी इथचे राहणारे होते.

जबलपूरवरुन बंगळुरुकडं निघालं होतं सैन्य दलाचं वाहन :मध्यप्रदेशमधील जबलपूरहून भारतीय सैन्य दलाची गाडी बंगळुरुकडं निघाली होती. या गाडीमध्ये सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडी इथले पोपटराव खोत यांच्यासह जवान बसले होते. सैनिकाची गाडी बंगळुरुकडं जात असताना अचानक मागून आलेल्या एका भरधाव टँकरनं सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी मोठा अपघात झाला. यामध्ये लोणारवाडी गावचे सुपुत्र पोपट खोत हे जागीच ठार झाले. तर त्यांचे एक सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पॅरा कमांडोत हवालदार म्हणून कार्यरत :पोपट खोत हे लोणारवाडी गावचे सुपुत्र पॅरा कमांडोचे हवालदार म्हणून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्याच्या अगोदरच पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती सैन्य दलाच्या वतीनं त्यांच्या निकटवर्तीयांना देण्यात आली. पोपट खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यासह लोणारवाडी गावावर शोककळा पसरली आहे. पोपट खोत हे 34 वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, आई आणि बहिणी असा परिवार आहे. कर्तव्य बजावत असताना पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं लोणारवाडी गावात त्यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Lakakh Army Vehicle Accident : लडाख येथे झालेल्या अपघातात कोल्हापुरातील जवानाला वीरमरण
  2. Suraj Shelke : लेहमध्ये लष्करी ऑपरेशन दरम्यान सातार्‍यातील जवान सूरज शेळके शहीद
  3. Vasudev Damodar Avari : भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावताना हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details