महाराष्ट्र

maharashtra

हिंदू मुस्लिम ऐक्याच्या मोहरम ताबूत भेटी सोहळ्यावर पावसाचे विरजण

By

Published : Aug 13, 2022, 1:10 PM IST

कडेगाव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत संपूर्ण देशात व राज्यात प्रसिद्ध आहेत.येथील मोहरमची परंपरा वेगळी आहे.या ठिकाणी मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात. मोहरम निमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.

kadegaons moharram tabut visit ceremony in sangli is full of excitement
हिंदू मुस्लिम ऐक्याच्या मोहरम ताबूत भेटी सोहळ्यावर पावसाचे विरजण

सांगली हिंदी मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणाऱ्या कडेगावच्या मोहरम ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला आहे. मात्र, पावसामुळे गगनचुंबी ताबुतांच्या ऐवजी प्रतिकात्मक काही ताबूतांच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी पार पडणाऱ्या या ताबूत भेटी सोहळ्यावर यंदा पावसाची सावट पाहायला मिळाली.

ताबूतांचा प्रतिकात्मक भेटी सोहळा सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरम कोरोना नंतर प्रथमच उत्साहात साजरा झाला. मात्र, पावसाअभावी ताबूत मिरवणूक व भेटीला फाटा देत उत्सुदच्या माध्यमातून ताबूतांचा प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाल्या. मोहरम निमित्त सकाळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाचा गजरात वाजत गाजत मानाचा सातभाई ताबूत जवळ प्रथम फातेहा देऊन धार्मिक विधी पार पाडण्यात आला. त्यांनतर मानाचा सात भाई ताबूतचा उत्सुद घेऊन, देशपांडे, हकीम,बागवान,शेटे ,पाटील , अत्तार,इनामदार,तांबोळी,सुतार ,माईनकर,मसूदमातासह आदी ताबूत व पंजे बारा इमाम पंजे वगैरे ठिकाणी फातेहा देऊन धार्मिक विधी पार पाडण्यात आला. कोणाच्या संकटामुळे दोन वर्ष खंडित झालेल्या हाताभूत भेटींचा 16 यंदाच्या वर्षीही पावसाअभावी साध्या पद्धतीने पार पडला.

मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातातकडेगाव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत संपूर्ण देशात व राज्यात प्रसिद्ध आहेत.येथील मोहरमची परंपरा वेगळी आहे.या ठिकाणी मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात.मोहरम निमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.

मिरवणूक सोहळ्याला फाटा मागील दोन वर्षात कोरोना या महामारीच्या संकटामुळे मोहरम सण शांततेत पार पडले होते.यावर्षी मोहरम सण उत्साहात साजरा झाला. मात्र, मागील दोन दिवसात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लाकडी बांबू व मातीच्या साहाय्याने बनवलेले गगनचुंबी ताबूतांचा गळा भेटी व मिरवणूक सोहळ्याला फाटा देत प्रतिकात्मक भेटीचा सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम,आमदार मोहनराव कदम,आमदार अरुण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details