महाराष्ट्र

maharashtra

Sangli Water Issue Story : आजी-माजी सरपंच दाम्पत्याने मिळून एका विहीरीतून गावच्या पिण्याचा प्रश्न कायमचा सोडवला, वाचा सविस्तर

By

Published : Mar 7, 2023, 9:46 PM IST

Updated : Mar 8, 2023, 10:22 AM IST

Sangli Water Issue Story

सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या दोघा पती- पत्नीने पुढाकार गावातील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी पुढकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, लोक वर्गणी आणि स्वखर्चाच्या माध्यमातून तब्बल 52 लाख खर्चातून विहिरी खोदण्यात आली.

विहीरीतून गावच्या पिण्याचा प्रश्न कायमचा सोडवला

सांगली : जिल्ह्यातील आजी-माजी सरपंच दांपत्याने मिळून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या सलगरे येथे ग्रामपंचायतीने लोक वर्गणी आणि स्वखर्चातून भली मोठी विहीर खोदण्यात आली. आता या विहिरीत पुष्कळ पाणीसाठी निर्माण झाल्याने सलगरे ग्रामस्थांचा उन्हाळ्यातल्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली आहे.

पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला : सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील पूर्व भाग तसा दुष्काळीचा आहे. मात्र, आता पाण्याची टंचाई दूर करून गावाच्या वाट्याला येणारे भटकंती गावचे आजी-माजी सरपंच असणाऱ्या दाम्पत्यांनी मिटवली आहे. माजी सरपंच तानाजी पाटील आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या दोघा पती- पत्नीने पुढाकार घेऊन ग्रामपंचायत, लोक वर्गणी आणि स्वखर्चाच्या माध्यमातून तब्बल 52 लाख खर्चातून विहिरी खोदण्यात आली.

वर्गणीतून खोदली विहिर :गावातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तानाजी पाटील यांनी विहीर खोदायचा निर्णय घेतला. मग शासनाच्या माध्यमातून असणाऱ्या निकष प्रमाणे छोटीशी विहीर खोदून गावच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नव्हता. म्हणून 125 बाय 95 फूट खोल विहीर गावातल्या तलावाच्या ठिकाणी खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाकडून विहीर खोदण्यासाठी निधी देण्यात येतो. त्यामुळे माजी-उपसरपंच तानाजी पाटील यांनी लोक वर्गणी काढायचा निर्णय घेतला. तसेच कमी पडणारा निधी स्वतःच्या खिशातून घालायचा तयारी दर्शवली. आता भव्य दिव्य अशी विहीर खोदून तयार झाली, यामध्ये आता 70 फूट खोल इतका पाणीसाठा देखील झाला आहे. हे पाणी गावातल्या पाण्याच्या टाकीमध्ये सोडण्यात येते आणि विहिरीची हे पाणी आता घराघरांमध्ये पोहचू लागले आहे.

पाण्याचा आटला होता साठा : याबाबत माजी सरपंच तानाजी पाटील म्हणाले की, 2002 सालापासून आमच्या विचारांची ग्रामपंचायती मध्ये सत्ता आहे. यातून गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. ज्यातून वीस वर्षांपूर्वी असणाऱ्या गावाचा पाणीप्रश्न बऱ्यापैकी सोडवला होता. मग तो यंदाच्या जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा उद्भवला गावाच्या विहिरीचे पाणी खूप कमी झाले. तलावातील पाणी देखील आटले.

विहिरीत मुबलक पाण्याचा साठा :खरंतर गावातल्या महिलांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सर्वाधिक सहन करावा लागतो. त्यांना पाणी भरण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कुठेतरी कायमस्वरूपी निकाली काढावा या उद्देशाने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी मिळून गावात एक मोठी विहीर काढण्याचा निर्णय घेतला. ज्या तलावातून गावाला पाणी मिळते त्या कुरण तलावाच्या ठिकाणीच सव्वाशे बाय सव्वाशे आणि 95 फूट खोल विहीर काढण्याचा निर्णय झाला.आणि या ठिकाणी विहीर काढण्यात आली आहे. सध्या या विहीरी मध्ये 70 फूट इतका पाणी साठी झाला आहे. वास्तविक ही विहीर तलावाच्या ठिकाणी आहे पण तलावात आणि आसपास अजिबात पाणी नाही आहे. मात्र विहिरीमध्ये मुबलक पाण्याचा साठा आहे.

इतर गावांना देखील फायदा :खरंतर, विहीर काढण्यासाठी शासनाकडून 18 मीटर व्यास आणि 22 मीटर खोल विहीर खोदण्याची मंजूर मिळाली होती. मात्र विहीर शासन निर्णय प्रमाणे जर बनवली असती तर त्याचा फायदा गावाला झाला नसता. त्यामध्ये पाण्याचा खूप कमी साठा निर्माण झाला असता. यामुळे ग्रामपंचायत,ग्रामस्थ आणि आम्ही सगळ्यांनी मिळून गावाची पाण्याची गरज आहे. तेवढ्या प्रमाणात मोठी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 36 मीटर व्यास आणि 30 मीटर खोल विहीर काढली. आता या विहिरी मध्ये 70 फूट खोल इतका पाणी साठा झाला आहे.आणि सलगरे गावच नव्हे तर एरंडोली जिल्हा परिषद गटातल्या गावांना देखील इथून पाणीपुरवठा करणे शक्य आहे.

पालकमंत्र्यांना केली मागणी : ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगातून विहीर काढली आहे. विहीर काढण्यासाठी 52 लाख खर्च आला आहे. पण शासनाने नियम व निकष प्रमाणे 38 लाख रुपये निधी मंजूर केला. मात्र, 17 ते 18 लाख रुपये कमी पडत असल्याने आम्ही लोक वर्गणी आणि स्वतःच्या खिशातून वरील पैसे घातले. आता विहीरीच्या संरक्षण कठडे बांधण्यासाठी 48 लाख रुपयांची गरज आहे. त्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि जिल्हा परिषदेकडे याबाबत मागणी केली आहे. आणि निकष बाजूला ठेवून या गोष्टींकडे बघितलं पाहिजे गावाची गरज ओळखून आता नवे अध्यादेश विहिरीच्या बाबतीत काढली पाहिजे, असे मत यावेळी तानाजी पाटील यांनी व्यक्त केले आहे.



हेही वाचा : Maharashtra Budget 2023: अर्थसंकल्पातून राज्याला काय? शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूदीची शक्यता

Last Updated :Mar 8, 2023, 10:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details