महाराष्ट्र

maharashtra

Tanaji Patil ED Inquiry : शिंदे गटाचे नेते तानाजी पाटील विरुद्ध ईडी चौकशीची मागणी; मनी लॉन्ड्रीग झाल्याचा आरोप

By

Published : Dec 14, 2022, 3:16 PM IST

आटपाडीचे शिंदे गट शिवसेनेचे नेते तानाजी पाटील (Tanaji Patil Shinde group leader) यांच्यासह कुटुंबाची ईडीमार्फत (Tanaji Patil ED Inquiry) चौकशी करावी, अशी मागणी आटपाडीतील सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी व मच्छिंद्र माळी (Ashok Mali and Machindra Mali) यांनी केली आहे. याच बरोबर तानाजी पाटील व मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आटपाडी तालुक्यात एकूण 1070 एकर जमीन मिळविली (to acquire land)आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

Tanaji Patil ED Inquiry
शिंदे गटाचे नेते तानाजी पाटील

सांगली : आटपाडीचे शिंदे गट शिवसेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील (Tanaji Patil Shinde group leader) यांच्यासह कुटुंबाची ईडीकडून (Tanaji Patil ED Inquiry) चौकशी करावी, अशी मागणी आटपाडीतील सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी व मच्छिंद्र माळी (Ashok Mali and Machindra Mali) यांनी केली आहे. तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना पदाचा गैरवापर करून एक हजार सत्तर एकर जमीन संपादित केली (to acquire land) आहे. तसेच तानाजी पाटील यांनी मुंबई, पुणे याच सह मोठ्या शहरांमधून स्थावर मालमत्ता घेत त्यामध्ये गुंतवणूक केली आहे.

अशोक माळी प्रतिक्रिया

संपत्तीची चौकशी करावी :याच बरोबर तानाजी पाटील व मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आटपाडी तालुक्यातील दिघंची, करगणी, आटपाडी, पुजारवाडी, शेरेवाडी, मुढेवाडी, विठ्ठलापूर, मापटेमळा, खरसुंडी, यासह वासुद ता. सांगोला जि. सोलापूर याठिकाणी एकूण 1070 एकर जमीन मिळविली आहे.

बेकायदेशीर संपत्ती असल्याचा आरोप :तसेच तानाजी पाटील यांच्या मुलासह त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर या जमिनी आहेत. हे सर्व बेकायदेशीर संपत्ती, यामध्ये मनी लॉन्ड्रीग झाली असून या सर्व मालमत्ता आणि संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी मच्छिंद्र माळी यांनी मुंबई येथे ईडी कार्यालयाकडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details