महाराष्ट्र

maharashtra

द्राक्षबाग शेतकऱ्यांवर वटवाघळांचे सावट; रात्रीत द्राक्षबागा उद्धवस्त

By

Published : Dec 26, 2019, 8:11 PM IST

महापूर, अतिवृष्टीच्या संकटानंतर द्राक्षबागांवरील संकटात आणखी भर पडली आहे. मिरजच्या पूर्वभागात द्राक्षबागांवर वटवाघळांनी हल्ला चढवल्याचा प्रकार समोर आला आहे.

bats affecting grape farms in sangli
द्राक्षबाग शेतकऱ्यांवर वटवाघुळांचे सावट; रात्रीत द्राक्षबागा उद्धवस्त

सांगली- महापूर, अतिवृष्टीच्या संकटानंतर द्राक्षबागांवरील संकटात आणखी भर पडली आहे. मिरजच्या पूर्वभागात द्राक्षबागांवर वटवाघळांनी हल्ला चढवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे.

द्राक्षबाग शेतकऱ्यांवर वटवाघुळांचे सावट; रात्रीत द्राक्षबागा उद्धवस्त

यंदा जिल्ह्याला महापूर अतिवृष्टीने झोडपले. यामध्ये हजारो एकर द्राक्षबागा उद्धवस्त झाल्या आहेत. या संकटातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगवल्या आहेत. मात्र, आता या बागांवर वाढलेल्या वटवाघळांच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. मिरज तालुक्यातील आरग, लिंगनूर आणि बेडग गावांतील द्राक्षबागांवर गेल्या 15 दिवसांपासून रात्रीच्या वेळी वटवाघळांचे हल्ले होत आहेत. यामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे हल्ले कसे रोखायचे असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

Intro:
File name - mh_sng_02_draksh_baga_vatvaghul_halle_ready_to_air_7203751

स्लग - द्राक्षबाग शेतकऱ्यांवर वटवाघुळांचे अस्मानी संकट,रात्रीत करतंयत द्राक्षबागा उद्धवस्त..

अँकर - महापूर,अतिवृष्टीच्या संकटानंतर सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागांवर आता आणखी एक अस्मानी संकट आले आहे. मिरजेच्या पूर्वभागात द्राक्षबागांवर वटवाघुळांने हल्ला चढवत उध्वस्त केल्या आहेत.त्यामुळे द्राक्षबागा शेतकरी पुरता हादरून गेला आहे.Body:सांगली जिल्ह्यात यंदा महापूर, अतिवृष्टीमुळे हजारो एकर द्राक्षबागा उद्धवस्त झाल्या आहेत.या संकटातूनही शेतकऱ्यांना अथक प्रयत्न करून द्राक्षबागा जगवल्या आहेत.मात्र आता या बागांवर आणखी एक आस्मानी संकट आले आहे.आणि हे नवे संकट आहे, "वटवाघुळांच्या हल्ल्याचे".
मिरज तालुक्यातील आरग,लिंगनूर आणि बेडग गावात असलेल्या द्राक्षबागांवर गेल्या 15 दिवसांपासून रात्रीच्या वेळी वटवाघुळांचे हल्ले होत आहेत.वटवाघुळांचे टोळधाड द्राक्षबांगवर हल्ले चढवत ,विक्रीसाठी आलेले द्राक्षघड फस्त करत आहेत.त्यामुळे द्राक्षबागा शेतकरयांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.तर रात्रीच्या वेळीस वटवाघुळांचे होणारे,हे हल्ले कसे रोखायचे ? असा अवघड प्रश्न द्राक्षबागा शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे.

अनेक गावात रात्रीच्या वेळी वटवाघुळांनी
द्राक्षबागांवर हल्ला चढवून द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी या नव्या संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने नुकसान झालेल्या द्राक्षबागांचा पंचनामे करून भरपाई द्यावे,अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details