महाराष्ट्र

maharashtra

whale calf death : गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आलेल्या 'त्या' व्हेल माशाचा अखेर मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 8:10 AM IST

Updated : Nov 16, 2023, 12:20 PM IST

whale calf death in Ratnagiri : गणपतीपुळे इथल्या समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू झालाय. गेली दोन दिवसांपासून या माशाचा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं.

whale calf death
whale calf death

42 तासांची झुंज संपली

रत्नागिरी whale calf death in Ratnagiri :गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळून आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झालाय. गेल्या 42 तासांपासून ग्रामस्थांसह प्रशासनाकडून या माशाचा जीव वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आलंय. बुधवारी रात्री या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झालाय. सायंकाळी भरतीची वेळ नसल्यानं या माशाला जिवंत ठेवण्यासाठी त्याला पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं असल्यानं एमटीडीसी कर्मचारी तसंच ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांनी समुद्राच्या पाण्याचा मारा करून त्याला जिवंत ठेवलं होतं.

माशाचा जिव वाचवण्यासाठी वनविभागाकडून आटोकाट प्रयत्न : दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत आढळून आलं होतं. या पिल्लाची प्रकृती खालावलेली होती. ग्रामस्थांनी लगेच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी खुप प्रयत्न सुरू होते. कापड्यामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या माशाला जेसीबीच्या सहाय्यानं समुद्रात सोडण्यात आलं होतं.

5 ते 6 टन वजन : मात्र, बुधवारी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आलं. 20 फुटांहून अधिक लांब आणि 5 ते 6 टन इतकं या माशाच्या पिल्लाचं वजन होतं. पर्यटक, स्थानिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसंच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झालाय.

व्हेल मासे कसे मरण पावतात : व्हेल मासे जेव्हा बांगडा किंवा तारली, माकूळ यांचा पाठलाग करत असतील तर ते किनाऱ्याकडं येऊ शकतात. असा पाठलाग करत असताना ओहोटी सुरु झाली तर ते किनाऱ्यावरील वाळूत अडकून पडतात. त्यांच्या महाकाय शरीराचा भार ते पाण्यात असताना सहज पेलू शकतात. पण पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळंच त्यांची इंद्रियं दबली जातात. तसंच पाण्याबाहेर असल्यानं त्यांची त्वचा सुकू लागली की त्याखालील चरबीच्या थरामुळं त्यांच्या शरीरात खूप उष्णता निर्माण होते. अतिउष्णतेमुळं डिहायड्रेशन होऊन ते मरण पावतात.

हेही वाचा :

  1. Whale Fish Rescue : गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी अडकलं व्हेल माशाचं पिलू; त्याला अथक प्रयत्नांनी सोडलं समुद्रात
  2. Blue Whel Fish found : रायगडमधील घारापुरी बंदर किनारी सापडला तब्बल ३० फुटी मृत ब्लु व्हेल मासा, जाणून घ्या ...
Last Updated : Nov 16, 2023, 12:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details