महाराष्ट्र

maharashtra

नियमांचे पालन करुनच 'जरंडेश्‍वर'ला कर्ज दिले -डॉ. तानाजीराव चोरगे

By

Published : Jul 17, 2021, 8:16 PM IST

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीचे पत्र आले आहे. याबाबत बँकेकडून खुलासा करण्यात आला आहे. जरंडेश्‍वर कारखान्याला केलेला कर्जपुरवठा नियमांचे पालन करुनच करण्यात आला आहे. यामध्ये 8 कोटी 75 लाखांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँक
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

रत्नागिरी - जरंडेश्‍वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्ज पुरवठ्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीचे पत्र आले आहे. याबाबत बँकेकडून खुलासा करण्यात आला आहे. जरंडेश्‍वर साखर कारखान्याला केलेला कर्जपुरवठा नियमांचे पालन करुनच करण्यात आला आहे. यामध्ये 8 कोटी 75 लाखांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. जून महिन्यात दिलेल्या कर्जावरील व्याजाचा पहिला हप्ता जुलै महिन्यात बँकेकडे जमाही झाला आहे. यासंदर्भात मागवण्यात आलेली सर्व माहिती ईडीकडे सादर करण्यात आली आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी यांनी दिली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

जरंडेश्‍वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्ज पुरवठ्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीचे पत्र आले आहे. याबाबतचा खुलासा करताना, बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे

'बँकेने दिलेले कर्ज सुरक्षित'

बँकेने दिलेले कर्ज सुरक्षित आहे. जरंडेश्‍वर सहकारी शुगर मिल्स प्रा. लिमीटेड कंपनीने जरंडेश्‍वर साखर कारखाना चालवण्यास घेतली आहे. शुगर मिल्स कंपनीने उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी लिड बँकेसह पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 259 कोटीच्या कर्जाची मागणी केली होती. पाच बँकांनी मिळून मंजूर केलेल्या 167 कोटींपैकी 58 कोटी रुपये जून महिन्यात वितरीत केले. रत्नागिरी बँकेने 8 कोटी 75 लाखांचे कर्ज जून 2021 ला 12 टक्के व्याजाने दिले. कर्ज देताना बँकेकडून उपाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने कारखान्याची परिस्थिती प्रत्यक्ष जाऊन पाहीली होती. परतफेडीची खात्री करुनच कर्ज मंजूर करण्यात आले आहे. कर्ज देताना 425 कोटींची मालमत्ता तारण म्हणून पुणे बँकेकडे आहे. तसेच, जुलै महिन्याच्या सुरवातीलाच व्याजाचा पहिला हप्ता जमा झाला असल्याचेही चोरगे यांनी सांगितले आहे.

'ईडीला सर्व माहिती सादर'

जरंडेश्‍वर कारखान्यासंदर्भात ईडीकडून व्यवहारातील पारदर्शकता तपासली जात आहे. त्यांच्या पत्रानुसार कर्ज कोणत्या प्रकारचे दिले, मॉर्गेजविषयक माहिती, कर्ज वितरणाचा कालावधी, कर्ज वितरण कोणत्या पध्दतीने झाले, जरंडेश्‍वर कंपनीचे प्रमुख यासह अन्य काही कागदपंत्रांची माहिती मागवली होती. ती रत्नागिरी बँकेकडून सादर केली आहे, अशी माहिती चोरगे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कर्जासंदर्भात आवाहन केले होते. मात्र, बॅकेने पूर्णतः माहिती घेऊन चांगल्या कारखान्याला कर्ज पुरवठा केला आहे. त्याचा कोणताही परिणाम बँकेवर होणार नाही. जरंडेश्‍वर कंपनीने ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे, त्यानुसार विनियोग होतो की नाही याची माहिती दर तीन महिन्यांनी घेतली जाणार असल्याचेही चोरगे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details