महाराष्ट्र

maharashtra

गणपतीपुळेत व्यावसायिकांनी केले सरकारच्या निर्णयाचे स्वागत, मंदिरे उघडल्याने फायदाच!

By

Published : Nov 16, 2020, 2:59 PM IST

मंदिरे सुरू झाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकही आनंद व्यक्त करत आहेत. गणपतीपुळे येथील स्थानिक व्यावसायिकांनी सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.

ganapatipule shopkeepers news
गणपतीपुळे मंदिरे सुरू

गणपतीपुळे (रत्नागिरी) -लॉकडाऊनमध्ये तब्बल आठ महिने बंद असलेले गणपतीपुळे मंदिर आजपासून शासनाच्या निर्णयामुळे भाविकांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथे देखील भाविक दाखल झाले आहेत. मंदिर सुरू झाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकही आनंद व्यक्त करत आहेत.

गणपतीपुळे मंदिर सुरू
सरकारच्या निर्णयाचे स्वागत
गणपतीपुळे मंदिर आजपासून खुलं झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. कारण मंदिरात येणाऱ्या भाविकांमुळे स्थानिक दुकानदारांचे आर्थिक गणित अवलंबून असते. मंदिरे पुन्हा सुरू झाल्याने भाविक आता दर्शनासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकही खुश झाले असून सरकारच्या या निर्णयाबद्दल स्थानिक व्यापाऱ्यांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा -मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिर खुले; भाविकांची गर्दी
व्यावसायिक घेत आहेत योग्य ती खबरदारी
कोरोनामुळे मंदिर बंद झाल्याने आमची दुकानेही बंद झाली होती. मात्र आता दुकाने सुद्धा सुरू झाली आहेत. योग्य ती खबरदारी घेऊन ग्राहक आणि आमच्यामध्ये पारदर्शक प्लास्टिक लावून दुकाने चालवत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यवसायिक पराग केदार यांनी दिली आहे. दुकान बंद असल्याने आमची परिस्थिती हलाखीची झाली होती, कारण आमचे पोट पूर्णतः या व्यवसायावर अवलंबून आहे. पण आता मंदिरे सुरू झाल्याने, आमची दुकानंही सुरू झाली आहेत. त्यामुळे आनंद होत असल्याची प्रतिक्रिया कुमार राजवाडकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरुवात; चेन्नईतील भक्तांना मिळाला सर्वप्रथम दर्शनाचा मान

ABOUT THE AUTHOR

...view details