महाराष्ट्र

maharashtra

भाजपला 'सामना'तून अंधाराची भाषा शिकवण्याची गरज नाही..

By

Published : Jan 29, 2020, 12:47 PM IST

सामना वृत्तपत्रातून 'काळोखात काम करू नका, या लेखाच्या माध्यमातून भाजपवर टीका करण्यात आली होती. या टीकेला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Prasad Lad
प्रसाद लाड

रत्नागिरी- काळोखात काम करू नका, या सामनाच्या अग्रेलखाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काळ्या अंधारात काम करू नका, ही भूमिका शिवसेनेची नसावी, त्या दैनिकाच्या संपादकाची असावी. काळ्या अंधारात काम कोण करतं, याची कबुली त्यांनी महाराष्ट्रातील एका मोठ्या वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिली होती. त्यामुळे सामनातून अंधाराची भाषा भाजपला शिकवण्याची गरज नाही, असे लाड म्हणाले.

प्रसाद लाड, भाजप नेते

कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासाबाबत बोलताना लाड म्हणाले की, एनआयएच्या तपासाची कारणं फारच वेगळी आहेत. शहरी दहशतवादामुळे हा तपास केंद्राने एनआयएकडे दिला आहे. ज्यावेळेला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस करत होते. त्यावेळी शिवसेनाही सत्तेत होती त्यावेळीच त्यांनी हा प्रश्न तेव्हाच्या कॅबिनेटमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांना का विचारला नाही? असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे, याबाबाबत बोलताना लाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी काम केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसच म्हणाले आहेत की, कुठल्याही पद्धतीची चौकशी करा. पण, पारदर्शकपणे करा आमचा आक्षेप नाही. पण, हे करत असताना कुठलाही राजकीय द्वेष ठेवून सुडबुद्धीने राजकारण करू नका. मात्र, हे करताना त्यांनी विचार करून करावे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक बोट दाखवलत तर 4 बोटे त्यांच्याकडे असतील हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा लाड यांनी दिला.
तर सुड भावनेने जर राजकारण करायचे असेल, तर त्यांनी निश्चित करावे. पण, हे देखील त्यांनी विसरू नये की, पुन्हा एकदा भाजपचे सरकार येवू शकते आणि केंद्रात देखील आमचे सरकार आहे. त्यामुळे सुड भावनेचे राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा गर्भीत इशारा लाड यांनी दिला.

सामनाला आम्ही किंमत देत नाही -

काळ्या अंधारात काम कोण करते, याची कबुली संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील एका मोठ्या वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या अग्रलेखाला आम्ही विचारत नाही. आम्ही त्याला कुठलीही किंमत देत नाही, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

Intro:
सामनातून अंधाराची भाषा भाजपला शिकवण्याची गरज नाही - प्रसाद लाड

भूमिका शिवसेनेची नसावी त्या दैनिकाच्या संपादकाची असावी, - लाड

शहरी दहशतवादामुळे हा तपास केंद्राने एनआयएकडे दिला - प्रसाद लाड

राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येवू शकतं आणि केंद्रात देखील आमचं सरकार आहे हे कोणी विसरता कामा नये - प्रसाद लाड यांचा इशारा


रत्नागिरी, प्रतिनिधी

काळोखात काम करू नका या सामना अग्रेलखावरती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काळ्या अंधारात काम करू नका ही भूमिका शिवसेनेची नसावी त्या दैनिकाच्या संपादकाची असावी, काळ्या अंधारात काम कोण करतं याची कबुली त्यांनी महाराष्ट्रातील एका मोठ्या वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिली होती. काळ्या अंधारात कुणी काम केलं हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे सामनातून अंधाराची भाषा भाजपला शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अग्रलेखाला आम्ही विचारत नाही आम्ही त्याला कुठलीही किंमत देत नाही, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.ते आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.
कोरेगाव - भीमाचा तपासाबाबत बोलताना लाड म्हणाले की, एनआयएच्या तपासाची कारणं फारच वेगळी आहेत. शहरी दहशतवादामुळे हा तपास केंद्राने एनआयएकडे दिला आहे.
ज्यावेळेला भीमा कोरेगावचा तपास महाराष्ट्र पोलीस करत होते, त्यावेळी शिवसेनाही सत्तेत होती त्यावेळीच त्यांनी हा प्रश्न तेव्हाच्या कॅबिनेटमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांना का विचारला नाही. एनआयएच्या तापासातून सत्यच बाहेर पडेल.
दरम्यान याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे, याबाबाबत बोलताना लाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी काम केलं आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसच म्हणाले आहेत, क कुठल्याही पद्धतीची चौकशी करा पण पारदर्शकपणे करा आमचा आक्षेप नाही. पण हे करत असताना कुठलाही राजकीय द्वेष ठेवून सुडबुद्धीने राजकारण करू नका.हे करताना त्यांनी विचार करून करावं, देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकबोट दाखवलत तर चार बोटं त्यांच्याकडे देखील असतील हे लक्षात ठेवावं असं लाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुड भावनेने जर राजकारण करायचं असेल तर त्यांनी निश्चित करावं पण हे देखील त्यांनी विसरू नये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येवू शकतं आणि केंद्रात देखील आमचं सरकार आहे हे कोणी विसरता कामा नये, त्यामुळे सुड भावनेचं राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही असा गर्भीत इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.
चौकशीसाठी सर्व दरवाजे उघडे असल्याचंही लाड यावेळी म्हणाले..

Byte - प्रसाद लाड, भाजप प्रदेश उपाध्यक्षBody:सामनातून अंधाराची भाषा भाजपला शिकवण्याची गरज नाही - प्रसाद लाड

भूमिका शिवसेनेची नसावी त्या दैनिकाच्या संपादकाची असावी, - लाड

शहरी दहशतवादामुळे हा तपास केंद्राने एनआयएकडे दिला - प्रसाद लाड

राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येवू शकतं आणि केंद्रात देखील आमचं सरकार आहे हे कोणी विसरता कामा नये - प्रसाद लाड यांचा इशाराConclusion:सामनातून अंधाराची भाषा भाजपला शिकवण्याची गरज नाही - प्रसाद लाड

भूमिका शिवसेनेची नसावी त्या दैनिकाच्या संपादकाची असावी, - लाड

शहरी दहशतवादामुळे हा तपास केंद्राने एनआयएकडे दिला - प्रसाद लाड

राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येवू शकतं आणि केंद्रात देखील आमचं सरकार आहे हे कोणी विसरता कामा नये - प्रसाद लाड यांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details