महाराष्ट्र

maharashtra

जगप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरातील बाप्पाचे ऑनलाईन लाईव्ह दर्शन ; 'या' लिंकवर करा किल्क

By

Published : Aug 22, 2020, 2:10 PM IST

जगप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी हजारो भाविक हजेरी लावत असतात. कारण वर्षातील फक्त याच दिवशी थेट श्रींच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येतं. मात्र, यावर्षी कोरोनाचं संकट असल्याने मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने बाप्पाचे ऑनलाईन लाईव्ह दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

गणपतीपुळे
गणपतीपुळे

रत्नागिरी - गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. जगप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी हजारो भाविक हजेरी लावत असतात. कारण वर्षातील फक्त याच दिवशी थेट श्रींच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने बाप्पाचे ऑनलाईन लाईव्ह दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

गणेशोत्सव काळात थेट गाभाऱ्यात जावून आपल्या लाडक्या गणरायाचे चरण स्पर्श करून दर्शन घेता येतं. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आहे. त्यामुळे गणपतीपुळे पंचक्रोशितल्या गावांतील प्रत्येक भक्तगण मंदिरात येऊन गणपतीचं दर्शन घेतो. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक खास या दिवशी गणपतीपुळेत येत असतात. यावर्षी मात्र कोरोनाचं संकट असल्याने मंदिरंही बंद आहेत. त्यामुळे ही परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे.

भक्तांना कोरोना संकटातही भाविकांना श्रींचे दर्शन घेता यावे, यासाठी गणपतीपुळे देवस्थान प्रशासनाने श्रींचे ऑनलाईन लाईव्ह दर्शन सुरू केलं आहे. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांसाठी हा निर्णय घेण्यात आला. www.ganpatipule.co.in या साईटवरून गणपतीपुळे मंदिरातील बाप्पाचे थेट लाईव्ह दर्शन भाविकांना घेता येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details