महाराष्ट्र

maharashtra

Dapoli-Mandangad Nagar Panchayat : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे उमेदवार; आमदार योगेश कदम यांचा थेट आरोप

By

Published : Jan 20, 2022, 10:33 AM IST

Updated : Feb 17, 2022, 10:40 AM IST

बुधवारी लागलेल्या निकालात दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचा 14 जागांवर विजय झाला, यामध्ये शिवसेना 6 आणि राष्ट्रवादीचा 8 जगावांर विजय झाला. (Dapoli-Mandangad Nagar Panchayat) तर नाराज शिवसेना अपक्ष 2 व भाजपचा 1 जागेवर विजय झाला आहे. तर मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा 7, शिवसेना अपक्ष 8 तर अन्य 2 जागांवर इतर अपक्ष विजयी झाले आहेत. (Dapoli Nagar Panchayat results) दरम्यान, यानंतर शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवत शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

शिवसेना आमदार योगेश कदम
शिवसेना आमदार योगेश कदम

रत्नागिरी -रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर खेड-दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवत शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. (Dapoli-Mandangad Nagar Panchayat Election 2022) शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर दापोली-मंडणगडमधील राजकारण पेटले आहे. त्यातच दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली. (Shiv Sena leader Ramdas Kadam) शिवसेनेने या निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर ही जबाबदारी दिली. त्यातच विद्यमान आमदार योगेश कदम यांना डावलून एबी फॉर्म देण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले. (Shiv Sena vr NCP) दरम्यान, नाराज शिवसैनिकांनी निवडणुकीत दोन्ही ठिकाणी अपक्ष फॉर्म भरले. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करत दोन्ही तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

शिवसेना अपक्ष 8 तर अन्य 2 जागांवर इतर अपक्ष विजयी

बुधवारी लागलेल्या निकालात दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचा 14 जागांवर विजय झाला, यामध्ये शिवसेना 6 आणि राष्ट्रवादीचा 8 जगावांर विजय झाला. तर नाराज शिवसेना अपक्ष 2 व भाजपचा 1 जागेवर विजय झाला आहे. तर मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा 7, शिवसेना अपक्ष 8 तर अन्य 2 जागांवर इतर अपक्ष विजयी झाले आहेत.

शिवसेनेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली

याबाबत बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले की, महाविकास आघाडी करायची असेल तर ज्याची ताकद आज जशी आहे तसे जागांचे वाटप झाले पाहिजे असे माझे म्हणणे होते. मात्र, ते झाल नाही. ते जर झाले असते तर मला महाविकास आघाडी मान्य होती. पूर्णपणे शिवसेनेचे खच्चीकरण करायचे, राष्ट्रवादीचे बळ वाढवायचे ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती. ती दुर्दैवाने दापोलीमध्ये यशस्वी झाली. पण त्यामुळे 5 वर्ष शिवसेनेची सत्ता ज्या दापोली नगरपंचायतीमध्ये होती ती आता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे गेलेली आहे. त्यामुळे फायदा राष्ट्रवादीचा झालेला आहे. अशी उघड नाराजी कदम यांनी बोलवून दाखवली आहे.

शिवसैनिकांना हा निर्णय मान्य नव्हता

जे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आहेत. त्यातील 6 पैकी 4 हे राष्ट्रवादीचे आहेत. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीमध्ये जेवढे मतदान शिवसेनेला मिळाले होते, त्यापेक्षा जास्त मतदान आता अपक्षांना मिळाले आहे. याचा अर्थ शिवसैनिक जागेवरच आहे. शिवसैनिकांना हा निर्णय मान्य नव्हता, म्हणून हा लढा चालू असल्याचेही आमदार योगेश कदम यावेळी म्हणाले आहेत.

नगराध्यक्षच्या निवडणुकीत शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल

दरम्यान, मंडणगड नगरपंचायतीबाबत बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले की, मंडणगडमध्ये शिवसैनिकांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. ज्यावेळी मंडणगड नगरपंचायतीच्या जागांबाबत निर्णय झाला, तो शिवसैनिकांवर अन्याय करणारा निर्णय होता, त्यामुळेच शिवसैनिकांनी वेगळा गट स्थापन करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि काहीही करून मंडणगड नगरपंचायतीवर भगवा फडकवायचा हा निर्धार केला. आहे. रामदास भाई आणि मी पूर्णपणे या निवडणुकीपासून अलिप्त होतो. प्रचारामध्ये आम्ही कुठेही सहभाग घेतला नाही. मनाला दुःख झाले होते, शिवसेनेची जास्त ताकद असताना कमी जागा आणि राष्ट्रवादीची ताकद कमी असताना देखील राष्ट्रवादीला जास्त जागा असे जागांचं वाटप करून शिवसैनिकांवर अन्याय केलाय असही कदम यावेळी म्हणाले आहेत. मंडणगडच्या निकालामध्ये जाहीर झाले की, शिवसेना फक्त 4 जागांवर लढली पण तिथे आज शिवसैनिक अपक्ष म्हणून उभे राहिले ते 8 निवडून येतात, म्हणजे सत्ता जवळपास शिवसेनेची एकहाती आली असती, पण नगराध्यक्षच्या निवडणुकीत शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -दुसऱ्याची काम स्वतःच्या नावावर खपवणे हा 'पराक्रम' नाही;सामनातून मोदी सरकारचा समाचार

Last Updated :Feb 17, 2022, 10:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details