महाराष्ट्र

maharashtra

एनसीबीचा वापर नागरिकांना बदनाम करत तुरुंगात ठेवण्यासाठीच - जयंत पाटील

By

Published : Oct 28, 2021, 3:12 PM IST

Updated : Oct 28, 2021, 3:32 PM IST

पाटील
पाटील ()

नवाब मलिक पुराव्यानिशी बोलत आहेत. दरम्यान एनसीबीचे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठीच आहे. एनसीबीचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी आणि तुरुंगात ठेवण्यासाठी होतोय, असा आरोप यावेळी पाटील यांनी केला. आज शारूख खान यांच्या मुलाच्या बाबतीत झाले यापुर्वी अनेकांच्या बाबतीत झाले असावे, त्यामुळे या सर्व प्रकारची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे पाटील यावेळी म्हणाले.

रत्नागिरी -एनसीबीचे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठीच असून, एनसीबीचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी आणि तुरुंगात ठेवण्यासाठी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. ते आज दापोलीत बोलत होते. शिवाय यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर बोलतांना म्हणाले, की जलयुक्त शिवारची चौकशी अजून संपलेली नाही. त्यामुळे आंदोत्सव साजरा करण्याची काहीही गरज नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

के पी गोस्वामींवर काही गंभीर आरोप असल्यामुळे त्यांना अटक झाली आहे. ज्या क्रूझवर धाड पडली, त्या बोटीवर देखील गोस्वामी सहभागी होते. तिथे खंडणी कशी घ्यायची २५ कोटी कि १८ कोटी त्यांच्यासोबच्या सहाय्याकांनी त्याची जबानी दिली आहे. हे दोन्ही गंभीर आरोप आहेत. या देशात एनसीबीचा वापर राजकीयदृष्ट्या होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहेत. नवाब मलिक पुराव्यानिशी बोलत आहेत. दरम्यान एनसीबीचे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठीच आहे. एनसीबीचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी आणि तुरुंगात ठेवण्यासाठी होतोय, असा आरोप यावेळी पाटील यांनी केला. आज शारूख खान यांच्या मुलाच्या बाबतीत झाले यापुर्वी अनेकांच्या बाबतीत झाले असावे, त्यामुळे या सर्व प्रकारची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे पाटील यावेळी म्हणाले. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी केंद्रीय चौकशी समिती दाखल झाली आहे. मुळात वानखेडे यांनी घेतलेला जातीचा दाखला, तो कोणत्या जातीच्या आधारे घेतला आहे. हे चौकशीत उघड होईल. दिल्लीहून आलेली चौकशी समिती खऱ्या गोष्टींची चौकशी करेल, कोणत्याही गोष्टीवर पांघरूण घालण्यासाठी ही समिती आलेली नसावी, असा माझा अंदाज असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

'केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत आहे'

नवाब मलिक यांचे आरोप वानखेडेंविरोधात नाहीत, तर यंत्रणा कशा चुका करतात आणि दिशाभुल करतायत हे जनतेसमोर यावे, यासाठी नबाव मलिक यांचा प्रयत्न आहे. सर्व केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून या देशातल्या नागरिकांना छळण्याचे आणि बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

'जे भाजपामध्ये नाहीत अशांवर धाडी पडतायत'

बुलढाणा बॅकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिली आहेत. पण अशोक चव्हाण यांना अडचणीत आणायचे आणि त्यांच्यावर अंकुश ठेवायासाठी त्यांना भिती दाखवण्यासाठीची ही कारवाई असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्राची आता खात्री झालीय धाडी होतायत त्या राजकीय नेत्यांवर होत आहेत. पण गुन्हेगार असलेल्यांवर कारवाई होत नाही, धाडी फक्त महाराष्ट्रात होतात. महाराष्ट्रात फक्त राजकारण्यांवर होतात आणि जे भाजपामध्ये नाहीत अशांवर होतात. त्यामुळे झोप घेण्यासाठी आता अनेकजण भाजपामध्ये जायला लागते, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे.

'जलयुक्त शिवारची चौकशी अजून संपलेली नाही'

जलयुक्त शिवारची चौकशी अजून संपलेली नाही. चौकशी निष्कर्षाप्रत अजून आलेली नाही. चौकशी निष्कर्षाप्रत आलेली नसल्याने आनंद उत्सव साजरा करण्याची गरज नाही, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे. आमचे सरकार अन्याय करण्यासाठी नाही, जलयुक्तची चौकशी निरपेक्षपणे होईल, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. भाजपाला आनंद मानण्याची गरज काय, ते त्यामध्ये गुन्हेगार होते का? भाजपा पक्षांने जलयुक्त शिवारात स्वताला क्लिन चिट घेवून आनंद उत्सव साजरा करणे, इतकी घाई कशाला? असा सवाल जयंत पाटील यांनी भाजपाला विचारला आहे. चौकशी चालू आहे, चौकशी अजून पुर्ण होणार आहे. भाजपाने अजून थांबावे, असा सूचक इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा -देशाच्या यंत्रणांमध्ये सचोटी आणि सच्चाई जिवंत आहे; पेगसिस प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Last Updated :Oct 28, 2021, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details