महाराष्ट्र

maharashtra

Kirit Somaiya : अनिल परबांचे रिसॉर्ट 50 दिवसात जमीनदोस्त होणार - किरीट सोमय्या

By

Published : Nov 22, 2022, 10:56 AM IST

Updated : Nov 22, 2022, 9:04 PM IST

Kirit Somaiya: किरीट सोमैय्या सकाळी दापोली पोलीस स्टेशनला पोहोचले. साई रिसॉर्ट (Sai Resort Dapoli) पाडकामाची माहिती त्यांनी घेतली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कर्मचाऱ्यांच्या साथीने सोमय्यांनी परबांच्या रिसॉर्टवऱ हातोडा चालवला. अनिल परबांचे रिसाॅर्ट 50 दिवसांत जमीनदोस्त होणार असे ते म्हणाले.

Kirit Somaiya
Kirit Somaiya

रत्नागिरी:किरीट सोमैय्या सकाळी दापोली पोलीस स्टेशनला पोहोचले. दापोलीतही मोठा पोलीस फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता. साई रिसॉर्ट (Sai Resort Dapoli) पाडकामाची माहिती त्यांनी घेतली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कर्मचाऱ्यांच्या साथीने सोमय्यांनी परबांच्या रिसॉर्टवऱ हातोडा चालवला. अनिल परबांचे रिसाॅर्ट 50 दिवसांत जमीनदोस्त होणार असे ते म्हणाले. वादग्रस्त साई रिसॉर्ट आणि सी कौचवर आज हातोडा पडणार असे किरीट सोमैय्या यांनी म्हटलं होतं. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे.

अनिल परबांचे रिसाॅर्ट 50 दिवसांत जमीनदोस्त होणार -किरीट सोमय्या

काय म्हणाले सोमय्या?अनिल परब (Anil Parab) यांनी सरकारी जमीन ताब्यात घेतली होती, त्यावर आज आम्ही हातोडा मारला, 20 गुंठे जागा अनिल परब - साई रिसॉर्टने अनधिकृतरित्या बळकावली होती, ती परत सरकारी खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आजपासून सी कौच आणि साई रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे दोन्ही रिसॉर्ट 40 - 50 दिवसांत जमीनदोस्त झालेले असतील, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुरुड येथे दिली.

किरीट सोमैय्या पोलीस स्थानकात दाखल साई रिसॉर्टवर आज हातोडा पडणार

अनिल परब यांचे हे साई रिसॉर्ट असल्याचा दावा: दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट व सीकोंच दोन्ही रिसॉर्ट गेले. अनेक दिवस वादग्रस्त ठरले आहे. यापैकी सिकोंच रिसॉर्टवर हातोडा पडण्याची शक्यता आहे. माजी मंत्री अनिल परब यांचे हे साई रिसॉर्ट असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला होता. दरम्यान किरीट सोमैय्या दापोली पोलीस स्थानकाला भेट दिल्यानंतर मुरुड येथे प्रशासनाकडून कोणती तयारी केली याचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

दापोलीत चोख पोलीस बंदोबस्त:किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली होती. 10 पोलीस अधिकारी, अंमलदार 65, आरसीपी 1 तुकडी तैनात होती.

Last Updated : Nov 22, 2022, 9:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details