महाराष्ट्र

maharashtra

विघ्नहर्त्यावरच कोरोनाचे विघ्न... उद्यापासून गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी बंद

By

Published : Mar 16, 2020, 11:08 PM IST

Updated : Mar 16, 2020, 11:30 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून (दि. 17 मार्च) गणपतीपुळे मंदिरातील दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे.

गणपतीपुळे मंदीर
गणपतीपुळे मंदिर

रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून (दि. 17 मार्च) गणपतीपुळे मंदिरातील दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे.

विघ्नहर्त्यावरच कोरोनाचे विघ्न... उद्यापासून गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच देवस्थानांमध्ये काळजी घेतली जात आहे. अनेक ठिकाणचे दर्शन देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, रत्नागिरीतील गणपतीपुळेत दररोज हजारो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनाला येत असतात. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातही वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उद्यापासून मंदिर (मंगळवार) बंद ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानंतर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कोकणात किंवा गणपतीपुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची तसेच कोकणातील पर्यटकांची संख्या देखील कमी झाली होती. त्यानंतर आता गणपतीपुळे मंदिरातील 'श्रीं'चे दर्शन मंगळवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायावर देखील सध्या मोठा परिणाम दिसून आला असून हॉटेल्समधील बुकिंग देखील रद्द करण्यात आली आहेत.

हेही वाचा -...तर अशा थिएटरवर राज्य सरकार कारवाई करेल - अजित पवार

Last Updated : Mar 16, 2020, 11:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details