महाराष्ट्र

maharashtra

केंद्र सरकारच्या निषेधासाठी काँग्रेसचं ‘घंटा अन् थाळी नाद' आंदोलन

By

Published : Apr 14, 2021, 8:23 PM IST

Updated : Apr 14, 2021, 9:50 PM IST

केंद्र सरकारडून महाराष्ट्राला कोरोना लसीकरणाचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत रत्नागिरीतल्या जिल्हा काॅग्रेसनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. जिल्हा काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर ‘घंटा नाद-थाळी नाद' आंदोलन करण्यात आले.

आंदोलक
आंदोलक

रत्नागिरी -केंद्र सरकारडून महाराष्ट्राला कोरोना लसीकरणाचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत रत्नागिरीतल्या जिल्हा काॅग्रेसनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. जिल्हा काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर ‘घंटा नाद-थाळी नाद' आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या निषेधासाठी काँग्रेसचं ‘घंटा अन् थाळी नाद' आंदोलन

लसीकरण पुरवठ्यात केंद्राचा दुजाभाव - काँग्रेस

केंद्रसरकार महाराष्ट्राला कोरोना लसीकरणाच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा धिक्कार रत्नागिरीतल्या काॅग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कोरोना काळात महाराष्ट्र सरकारला लस पुरवठ्याच्या बाबतीत जो अन्याय केला आहे. त्या बाबतीत बुधवारी (दि.14 एप्रिल) येथील काँग्रेस भवन कार्यालयाबाहेर सकाळी 11 वाजता ‘घंटा नाद थाळी नाद' करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले, अन्वर काद्री, दिपक राऊत, हारीस शेकासन, बंडू सावंत, सुनील विश्वासराव, कपिल नागवेकर, सुस्मिता सुर्वे, रिझवाना शेख, आदी उपस्थित होते.

हेही वाचा -विशेष : आंब्याच्या पाठीमागे यावर्षी निसर्गाचं शुक्लकाष्ठ.. आंब्याचा दर काय आहे? कोकणचा आंबा कसा ओळखाल

हेही वाचा -रत्नागिरी शहरात लसीकरणाला पुन्हा सुरुवात; लसीकरण केद्रांबाहेर नागरिकांची गर्दी

Last Updated :Apr 14, 2021, 9:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details