महाराष्ट्र

maharashtra

Chiplun Bridge Collapse : चिपळूणमध्ये पूल दुर्घटना; मंत्री रवींद्र चव्हाणांनी पहाटे चार वाजता केली पाहणी, म्हणाले . . .

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 11:03 AM IST

Updated : Oct 17, 2023, 12:15 PM IST

Chiplun Bridge Collapse : चिपळूण इथं मुंबई गोवा महामार्गावर पूल कोसळल्यानं नागरिक चांगलेच हादरले आहेत. या दुर्घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Chiplun Bridge Collapse
मंत्री रवींद्र चव्हाणांनी पहाटे चार वाजता केली पाहणी

चिपळूणमध्ये पूल दुर्घटना

रत्नागिरी Chiplun Bridge Collapse : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण इथला पूल सोमवारी दुपारी कोसळल्यानं मोठी धावपळ झाली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी पूल कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं नागरिक हादरले. या प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पहाटे चार वाजता पाहणी केली. यावेळी मंत्री चव्हाण यांनी त्रिसदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल देतील, असं स्पष्ट केलं. या प्रकरणी कोणीही दोषी आढळलं, तरी कारवाई करण्यात येईल, असंही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

मंत्री रवींद्र चव्हाणांनी पहाटे चार वाजता केली पाहणी

मुंबई गोवा महामार्गावरील पूल कोसळला :मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख इथल्या गर्डरला तडा गेलेला पूल लाँचरच्या यंत्रणेसह सोमवारी दुपारी कोसळला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेची तातडीनं दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पहाटे दुर्घटनास्थळी चार वाजता भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार तसंच शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, राजेश सावंत, अनिकेत पटवर्धन आदी उपस्थित होते.

मंत्री रवींद्र चव्हाणांनी पहाटे चार वाजता केली पाहणी

पूल कोसळल्याची दुर्घटना दुर्दैवी :सोमवारी दुपारी पूल कोसळल्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सागंतिलं. या पुलाच्या डिझाईनमध्ये काही चूक झाली होती का?, आता काम करत असताना त्याच्या बांधणीत काही चूक झाली होती, हे आता सांगणं फार कठीण आहे. पण हे कशामुळे झालं आहे याचा तपास करणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तज्ज्ञ याची चौकशी करतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यानंतरच्या काळात यामध्ये असं होऊ नये, म्हणून नक्की काय करावं लागेल, या सर्व गोष्टींसाठी पुलांच्या कामातील तज्ज्ञ त्रिसदस्यीय समिती ही दुर्घटना कशामुळे झालीय याची तपासणी करतील, असंही त्यांनी यावेळी यांनी सांगितलं. काम करत असताना अधिक काळजी घेतली जाईल. दरम्यान तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कशी झाली दुर्घटना :मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेख इथला गर्डर तुटलेला पूल लाँचरच्या यंत्रणेसह सोमवारी दुपारी कोसळला. यावेळी मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. वाहन चालकांसह नागरिकांनी देखील अक्षरशः धूम ठोकली. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग देखील काही काळ ठप्प झाला होता. मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका इथं सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर सोमवारी सकाळी 8 वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी 2.45 वाजता हा पूल लाँचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेनं चिपळुणात एकच खळबळ उडाली. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचीही धावाधाव झाली. तर काहीकाळ महामार्ग ठप्प झाला होता.

हेही वाचा :

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला; सुदैवानं जीवितहानी नाही

Last Updated : Oct 17, 2023, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details