महाराष्ट्र

maharashtra

केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होतोय - एकनाथ शिंदे

By

Published : Nov 2, 2021, 3:04 PM IST

केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होतोय - एकनाथ शिंदे
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होतोय - एकनाथ शिंदे ()

केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असून यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या बाबतीतला विश्वास जनतेच्या मनातून कमी होतोय अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत दिली आहे. माजी गृहमंत्री यांनी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे, याबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

रत्नागिरी : केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असून यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या बाबतीतला विश्वास जनतेच्या मनातून कमी होतोय अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत दिली आहे. माजी गृहमंत्री यांनी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे, याबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होतोय - एकनाथ शिंदे

रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले होते तेव्हा माध्यमांशी ते बोलत होते.


केंद्रीय तपास यंत्रणांच्या बाबतीतला विश्वास लोकांच्या मनातून कमी होणं हे लोकशाहीमध्ये चांगलं नाही असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत. परंतु त्याचा कुठलाही परिणाम माझ्यावर झालेला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी धमकीविषयी बोलताना दिली. गडचिरोलीतील विकासकामांना तसेच तिथल्या युवकांच्या हाताला रोजगार कसा मिळेल याला आमचे प्राधान्य आहे असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details